Sanjay Raut on Nawab Malik ED Enquiry Sakal
महाराष्ट्र बातम्या

''कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी...'', मलिकांवरील कारवाईनंतर राऊत आक्रमक

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आज ईडीने मंत्री नवाब मलिक यांना घरातून ताब्यात घेतले. त्यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्याबाबत संजय राऊतांनी (Sanjay Raut) प्रतिक्रिया दिली आहे. एखाद्या गोष्टीची चौकशी होऊ शकते. पण, महाराष्ट्राच्या एका कॅबिनेट मंत्र्याला घरी येऊन घेऊन जातात हे योग्य नाही. फक्त २०२४ पर्यंत हे चालेल. २०२४ नंतर ते आहेत आणि आम्ही आहोत, असा धमकीवजा इशारा संजय राऊतांनी दिला. (Sanjay Raut on Nawab Malik ED Enquiry)

नवाब मलिक आणि आमच्यासारखे खूप लोक आहेत जे सातत्याने असत्याचा पर्दाफाश करत आहेत. जे सत्य बोलत आहेत. त्यामुळे त्यांच्या मागे ईडी लावली जात आहे. ईडीचे लोक घरी आले आणि नवाब मलिकांना घेऊन गेले. एखाद्या गोष्टीची चौकशी होऊ शकते. महाराष्ट्राच्या एका कॅबिनेट मंत्र्याला घरी येऊन घेऊन जातात हे योग्य नाही. पण, किरीट सोमय्यांनी भाजपच्या नेत्यांची काही प्रकरणं ईडीकडे दिली आहे. त्यांच्या घरी ईडी का पोहोचली नाही. ही सगळी प्रकरणं आम्ही ईडीकडे घेऊन जाणार आहोत. त्याचं काय झालं? हे आम्ही विचारणार आहोत, असंही संजय राऊत म्हणाले.

''कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी...'' -

२३ हजार कोटींचा शिपयार्ड कंपनींचा घोटाळा आहे. इतके वर्ष त्याला कोण संरक्षण देत आहे. ऋषी अग्रवाल यांच्यामागे कोण उभं आहे? त्यांच्यामागे कुठल्या तपासयंत्रणा आहे आणि या सरकारमधील कोणता परिवार त्यांच्यामागे उभा आहे? हे सर्व मी सांगणार आहे. केंद्रीय तपास यंत्रणांची पोलखोल करणार आहे. त्यासाठी कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल, असं संजय राऊत म्हणाले.

''तपास यंत्रणांनी तयारी ठेवावी'' -

भाजपचे विरोधक आहेत त्यांच्याच मागे तपास यंत्रणा माफिया टोळीप्रमाणे लावल्या जातात. पण, आम्ही घाबरणार नाही. शेवटी सत्याचा विजय या देशात होत असतो. २०२४ नंतर जे घडणार आहे त्याची तयारी तपास यंत्रणांनी ठेवावी, असंही राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilip Walse Patil : दूध भेसळ प्रकरणावरून बदनामी करणाऱ्यांना १०० कोटींची नोटीस: उच्च न्यायालयात दावा दाखल करणार

ECI SIR: ‘एसआयआर’ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्तांची बैठक; मुद्देनिहाय स्पष्टीकरण...

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये ट्रॅक्टर वेल्डिंगवेळी स्फोट, चौघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Uruli Kanchan Ganpati Visarjan : उरुळी कांचन येथील गणेश विसर्जन मिरवणूक रंगली १५ तास! मात्र डीजेला दिला मंडळानी फाटा

Beed News : करपलेली पिके अन् डोळ्यात अश्रू... बीडच्या बांधावर 'पालकमंत्री' सुनेत्रा पवार अन 'पंकजाताई मुंडे'

SCROLL FOR NEXT