Sanjay Raut Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut: २०२४ मध्ये तुम्ही पण जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवा; शिंदे गटाला राऊतांचा इशारा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेची चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीला या चर्चेची पूर्ण कल्पना आहे. प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेतील चर्चेची माहिती अधिकृतपणे देण्यात आली आहे. (Sanjay Raut news in Marathi)

प्रकाश आंबेडकर आणि त्यांचं संघटन आपल्यासोबत आलं तर महाराष्ट्रात आणि देशात परिवर्तनाची नांदी सुरू होईल. आंबेडकरांनी केलेलं वक्तव्य सकारात्मक आहे. आमची इच्छा होती शिवशक्ती-भिमशक्ती एकत्र यावी. देशातील आणि महाराष्ट्रातील सत्ता उलथवायची असेल तर या दोन शक्ती एकत्र येणं गरजेचं आहे, असंही राऊत यांनी म्हटलं. प्रकाश आंबेडकरांच्या स्वागतासाठी आम्ही तयार असल्याचे राऊत यांनी नमूद केलं.

ज्यांच्यामागे बहुसंख्य दलित आणि वंचित समाज आहे, असे प्रकाश आंबेडकर आहेत. उद्धव ठाकरे त्यांच्याशी चर्चा करत आहे. यावेळी दीपक केसरकर यांनी केलेल्या टीकेवर राऊत म्हणाले की, पक्षासाठी आणि महाराष्ट्रासाठी आम्ही पुन्हा जेलमध्ये जायला तयार आहोत. आम्ही तुमच्यासारखे पळपुटे आणि लफंगे नाहीत. तुम्ही म्हणजे न्यायालय नाही किंवा कायदा नाही. केसरकर खरचं असं बोलले असतील तर त्यांनी देखील २०२४ मध्ये कारागृहात जाण्याची तयारी ठेवावी, असा इशाराही त्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : जैन मुनि नयपद सागर यांच्या ताराराणींबाबतच्या वक्तव्यावरून वाद वाढला

मोठे अपडेट्स : IPL मध्ये १० नव्हे १२ संघांमध्ये जेतेपदाची स्पर्धा रंगणार? BCCI चा मास्टर प्लान, शंभरच्या आसपास लढती होणार...

'दारु प्यायचो, मासांहार करायचो, दिवसाला 200 सिगारेट ओढायचो' अमिताभ बच्चन यांनी केलेला खुलासा, म्हणालेले...'इतकी दारू प्यायचो की...'

2011 World Cup India Team: २०११ फायलनच्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील हिरो आत्ता काय करतात, दोन खेळाडू अद्यापही IPL खेळतात

SCROLL FOR NEXT