Sanjay Raut esakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut : संजय राऊत हुशार आहेत पण...; भाजप नेत्याकडून राऊतांना जोरदार चिमटा

उद्धव ठाकरेंकडे आता फार कमी आमदार आणि खासदार राहिले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Sanjay Raut : उद्धव ठाकरेंकडे आता फार कमी आमदार आणि खासदार राहिले आहेत. त्यामुळे उरलेल्या कार्यकर्त्यांना सांभाळून ठेवण्यासाठी त्यांना सरकार पडण्याची वक्तव्य करावी लागत आहेत असे विधान भाजप नेत्याने केले आहे.

हे ही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

यावेळी त्यांनी संजय राऊतांना चिमटे काढत काही सल्लेदेखील दिले आहेत. संजय राऊत जगातील सर्वात विद्नाव व्यक्ती आहेत, असे विधान भाजपच्या नेत्याने केले आहे.

राऊत हुशार आहेत, पण त्यांनी सकाळी सकाळी माध्यमांसमोर येऊन बोलण्यापेक्षा राज्याच्या हितासाठी चार गोष्टी कराव्यात, असा सल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

राऊतांनी सकाळी सकाळी माध्यमांसमोर येत टोमणे बंद करावेत असेदेखील बावनकुळे म्हणाले. टोमणे मारण्याऐवजी राऊतांनी विरोधी पक्ष म्हणून जी जबाबदारी मिळाली आहे. ती जबाबदारी काय आहे, ती योग्यरित्या पार पाडावी.

विकासाच्या दृष्टीने या पक्षाकडून चार गोष्टी अपेक्षित त्यावर लक्ष केंद्रीत करावेत. आम्ही विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस अशा सूचना करायचे असे यावेळी बावनकुळे यांनी सांगितले.

महाराष्ट्राची जनता टोमणे सभा, टोमण्यांना कंटाळली आहे. यापेक्षा राज्याच्या जनतेला काय वाटतं हा प्लॅटफॉर्म तयार करावा, असे बावनकुळे म्हणाले आहेत. बावनकुळे यांच्या या विधानानंतर राऊत नेमकं काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : इराण-अमेरिका युद्ध पुन्हा पेटणार? अमेरिकन सैन्याकडून हॉर्मुझजवळील 'बंदर अब्बास'मध्ये हवाई हल्ले

Yashvi Patel: पहिल्या सेटमध्ये पिछाडीवर, तरीही मारली बाजी! पाहा कसं पुण्याच्या यश्वी पटेलने नागपूरच्या खेळाडूला धूळ चारली!

Gluten Free Breakfast : ग्लूटेन-फ्री आणि टेस्टी! असा बनवा चविष्ट, पोटभर आणि फिटनेस फ्रेंडली ज्वारीचा उपमा!

भारत-नायजेरिया : नेहरूंपासून मोदींपर्यंत, दोन बलाढ्य देशांचे मैत्रीचे संबंध

Ambenali Ghat Accident: ‘ही दोस्‍ती तुटायची नाही’ म्‍हणतच जगाचा निरोप; आंबेनळी घाटात जीव गमावलेले पाचही जिवलग मित्र, आसगाव झाले सुन्न ..

SCROLL FOR NEXT