Sanjay Raut on Devendra Fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut: फडणवीसांची बुद्धी 'नॅनो'! संजय राऊतांचा घणाघात

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य हे आता चर्चेत आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Sanjay Raut Comment on deputy chief Minister Devendra Fadnavis: राज्यातील राजकारणावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य हे आता चर्चेत आले आहे. गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर जी आक्षेपार्ह वक्तव्य केली जात आहे त्यावरुन काल मुंबईमध्ये विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली प्रतिक्रिया विरोधी पक्षाच्या जिव्हारी लागली होती.

संजय राऊत यांनी साताऱ्यामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सत्ताधारी पक्षावर आपल्या नेहमीच्या शैलीत तोफ डागली आहे. त्यांनी एकनाथ शिंदे गट आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कालचा मोर्चा व्यवस्थित पाहिला नसल्याचे म्हटले आहे. फडणवीसांनी त्या मोर्चाला नॅनो असे म्हटले होते. त्यावरुन त्यांचे सर्व पदाधिकारी आणि फडणवीस यांनी केलेले विधान म्हणजे त्यांची बुद्धीमत्ता नॅनो असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. त्यावरुन आता वेगळ्याच राजकीय वक्तव्यांना सुरुवात झाली आहे. राऊत यांनी केलेलं वक्तव्य हे आता सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाले आहे.

मोर्चा अपयशी ठरल्याचे म्हणणारे शिंदे, फडणवीस हे मधल्या काळात दिल्लीला गेले होते. त्यांना दिल्लीश्वरानी गुंगीचे इंजेक्शन दिलेले दिसतंय. असे म्हणताना त्यांची गुंगी उतरायला तयार नाही, अशी सडेतोड टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. महाविकास आघाडीचा मोर्चा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना दिसला नाही, त्या आमदारांची बुद्धी देखील नॅनो आहे. खरं तर कालच्या मोर्चाचे स्वागत फडणवीसांनी करायला हवे होते पण तसे झाले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचा अपमान केला गेला आहे. त्याविरोधात या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

फडणवीस यांनी जे वक्तव्य केले त्याची अपेक्षा नव्हती. फडणवीस हे राज्याचे प्रगल्भ नेते आहेत. तो मोर्चा नॅनो आहे अशी भूमिका त्यांनी घेतली असेल तर त्यांना देखील गुंगीचे इंजेक्शन दिले गेले आहे. अशी टीका राऊत यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT