MP Sanjay Raut sakal
महाराष्ट्र बातम्या

...हा तर खोटारडेपणाचा कळस

संजय राऊत यांच्याकडून फडणवीसांच्या दाव्याचे खंडन

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : हा खोटारडेपणाचा कळस आहे. माणूस किती बेमालूमपणे खोटे बोलू शकतो. असत्याला सत्याचा मुलामा देऊन कितीही गुळगुळीत करण्याचा प्रयत्न केला तरी सत्य हे सत्य असते. त्यामुळे भंपक गोष्टीकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन करत शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला.

भाजपच्या प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येण्याचे ठरले होते. त्यावेळी मी त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसेनेकडून प्रतिसाद आला नाही, असा दावा केला होता. या दाव्याचे राऊत यांनी खंडन केले. राऊत यांनी ट्विटरवर फडणवीसांचा जुना व्हिडिओही टाकला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांचा ‘लाऊडस्पीकर’ असा उल्लेख केला होता. त्याचाही राऊतांनी आज समाचार घेतला. ते म्हणाले, ‘‘आमचा लाऊडस्पीकर हा महाराष्ट्राच्या जनतेचा बुलंद आवाज आहे आणि तो तसाच घुमत राहील. भाड्याचे भोंगे आणि लाऊडस्पीकर यात फरक आहे,’’ असा टोला लगावत त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही डिवचले.

आम्ही भाजपप्रमाणे सरकार कोसळेल, असे लाऊडस्पीकरवरुन सांगणार नाही. त्यांच्या पिपाण्या तेव्हा वाजत होत्या. पण हे सरकार टिकणार नाही. अंतर्गत कलहाने पडेल. कोणाला पिपाण्या वाजवायच्या आहेत, सनई-चौघडे वाजवायचे आहेत, ते वाजवू द्या. आमचा लाऊडस्पीकर हा महाराष्ट्राच्या जनतेचा बुलंद आवाज आहे आणि तो तसाच घुमत राहील, असे राऊत यांनी सांगितले. यावेळी राऊत यांनी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या राज्यातील दौऱ्याचेही कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : महाराष्ट्रातल्या राजुरा मतदारसंघात व्होटचोरी करून निवडून आला भाजप आमदार? राहुल गांधींनी आकडेवारीच मांडली

Rahul Gandhi: अखेर पडला राहूल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब! मोबाईलवर OTP आले आणि काँग्रेसचे मतदार डिलीट झाले, कशी झाली वोट चोरी

Latest Maharashtra News Updates : कर्नाटकमध्ये मतचोरी पकडल्याचे राहुल गांधी यांनी पुरावे केले सादर

Pune Crime : कोथरुडमध्ये गोळीबार; गाडीला साईड न दिल्याचा वाद की काहीतरी मोठं?

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT