sanjay raut esakal
महाराष्ट्र बातम्या

शरद पवारांची हिमालयाची उंची, हे कुठे टेंगुळ! - संजय राऊत

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शरद पवारांची (sharad pawar) हिमालयाची उंची, .हे कुठे टेंगुळ..कमी गांजा मारून बोलत आहेत. अशी खोचक टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपाचे चंद्रकांत पाटील (bjp chandrakant patil) यांच्यावर केली. दोन दिवसांपूर्वी सांगलीतील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकेरी उल्लेख केल्याचे समोर आले. त्यावर संजय राऊतांना ही टीका केलीय.. काय म्हणाले संजय राऊत...

आम्ही अशाप्रकारे कधीही नरेंद्र मोदींचा उल्लेख करत नाही...

भाजपचे महाराष्ट्रामधील एक नेते शरद पवारांचा अरे, तुरे असा एकेरी भाषेत करत होते. ही राज्याची परंपरा नाही. आम्ही अशाप्रकारे कधीही नरेंद्र मोदींचा उल्लेख करत नाही. आम्ही अमित शहांविषयी कधीही अशाप्रकारे बोललो नाही. अटलबिहारी वाजपेयी तर आमचे श्रद्धास्थानच होते आणि आहे. आम्ही आजही अडवाणींना मानतो. पण आपल्यापेक्षा वय, अनुभव, संस्कार, संस्कृतीने मोठे असलेले जी लोक आहेत, त्यांचा कायम आदर करावा. विचारांची लढाई विचारांनी लढावी, असा सल्ला वजा इशारा राऊतांनी पाटलांना दिला.

किरीट सोमय्यांना काश्मीरमध्ये पाठवा, आम्ही कागदपत्रं देतो!

जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीवरूनही राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला. 'जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती चिंताजनक आहेत. दहशतवाद्यांनी तिथं उच्छाद मांडला आहे. रोजच्या रोज काश्मिरी पंडित, शीख नागरिक व बिहारी मजुरांचे खून होत आहेत. केंद्रीय गृहमंत्र्यांनी यावर खुलासा करायला हवा,' अशी मागणी राऊत यांनी केली. 'महाराष्ट्रातील नेत्यांच्या व मंत्र्यांच्या विरोधात उठसूट आरोप करणारे किरीट सोमय्या व छापे टाकणाऱ्या ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय व एनसीबीसारख्या संस्थांना जम्मू-काश्मीरमध्ये पाठवा. ते खूप पॉवरफुल आहेत. त्यांना दहशतवाद्यांची संपूर्ण माहिती द्यायला, कागदपत्रे द्यायला आम्ही तयार आहोत,' असं राऊत यांनी सुनावलं.

भारत-पाक सामन्यानं प्रश्न सुटणार नाही, भाजपनं काश्मीरवर बोलावं

काश्मीरमध्ये कलम 370 हटवूनही परिस्थिती बदलली नाही. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठोस भूमिका घेणं आवश्यक आहे. 'काश्मीर' काय आहे हे आधी सरकारनं स्पष्ट करायला हवं? तसेच भारत-पाकिस्तान सामना खेळल्यानं प्रश्न सुटणार नाही, तर भाजपच्या नेत्यांनी काश्मीरवर बोलणं गरजेचं आहे. मोदी पाकिस्तानात जावून केक कापतात. हे भाजपच्या नेत्यांना कसं चालतं, असा सवालही खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची तीव्र प्रतिक्रिया

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

SCROLL FOR NEXT