Sanjay Raut Criticized TMC Over Goa Election e sakal
महाराष्ट्र बातम्या

''TMC गोव्यात सत्तेवर आलीय, फक्त...''; राऊतांचा ममतांना टोला

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : गोवा विधानसभा निवडणूक (Goa Assembly Election) काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. तृणमूल काँग्रेस (TMC) आणि आप (AAP) या दोन्ही पक्षांनी गोव्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांना टोला लगावला आहे.

गोव्यातील (Goa) राजकारण प्रस्थापितांच्या हातात गेलंय. भ्रष्टाचारी, ड्रग्स माफियांच्या हातात गोव्याचं सुत्र आहे. ते मोडीत काढायचं असेल तर गोवेकरांनी सामान्य माणसाला निवडून आणायला पाहिजे. गोव्यात हे होणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, असं संजय राऊत म्हणाले. तसेच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी होऊ शकली नाही. त्यासाठी आमचे प्रयत्न होते. पण, ते अयशस्वी ठरले. पण, गोव्यात फक्त १०-१२ लोक राजकारण करतात. तेच भूमाफिया आहेत. सध्या भाजपमध्ये प्रवेश केलेल्या लोक देखील ड्रग्स माफिया आहे, असा आरोप देखील संजय राऊतांनी (Sanjay Raut) केला.

फक्त शपथ घ्यायची बाकी -

शिवसेना गोव्यात १८ आणि १९ तारखेला गोव्यात पहिली उमेदवारी यादी जाहीर करणार आहे. पण, गोव्यात तृणमूल काँग्रेसची (TMC) वावर पाहता ते मनाने सत्तेवर आलेले आहेत. आता फक्त शपथ घ्यायची बाकी आहे, असा खोचक टोला त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना लगावला.

केजरीवालांना चिमटे -

संजय राऊतांनी आपवर टीका करत गोव्यात घरोघरी प्रचार करणाऱ्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देखील चिमटे काढले. दिल्लीत कोरोना वाढत असताना दिल्लीचे मुख्यमंत्री गोव्यात लोकांच्या दरवाज्यावर जाऊन प्रचार करत आहे. आपल्या पक्षाचा प्रचार करतात ते योग्य आहे. पण, ज्यावेळी पक्ष मजबूत असल्याचा दावा करतात तर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना गोव्यात यायची काय गरज आहे. सध्या दिल्लीला त्यांनी जास्त गरज आहे, असे चिमटे त्यांनी अरविंद केजरीवाल यांना काढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : मोठी बातमी! कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सारसबाग राहणार दोन दिवस बंद

Vaibhav Sooryavanshi Records: १२ षटकार, ५ चौकार! वैभवची Fastest IPL Century हुकली; २९ चेंडूंत ९७ धावांवर OUT; जयसूर्याचा विक्रम मात्र मोडला

Kolhapur LPG Tanker Accident : नागपूर-रत्नागिरी महामार्गावर LPG Gas टँकर पलटी; चालक जागीच ठार, रात्री 10 नंतर 'या' मार्गावरील वाहतूक बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Shendurwada Crime : अपहरण करून चालकास बेदम मारहाण; वाळुज पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Traffic: बकरी ईदनिमित्त पुण्यात गोळीबार मैदान परिसरातील वाहतुकीत बदल; अनेक रस्ते बंद, पर्यायी मार्ग जाहीर

SCROLL FOR NEXT