Sanjay Raut on devendra Fadnavis and bjp Sakal
महाराष्ट्र बातम्या

बाळासाहेब ठाकरेंचे नाव म्हणजे आग, आगीशी खेळू नका, राऊतांचा थेट इशारा

शिवसेनेच्या पाठीत अनेकांनी वार केले आहेत, राऊतांचा टोला

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेच्या पाठीत अनेकांनी वार केले आहेत, राऊतांचा टोला

राज्याची जनता महाराष्ट्रातील नव्या सरकारला स्वीकारणार नाही. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना पुढे जाणार आहे. बाळासाहेब ठाकरेंचे नाव म्हणजे आग, त्यामुळे आगीशी खेळू नका, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. शिवसेनेच्या पाठीत अनेकांनी वार केले आहेत, परंतु शिवसेना खचणार नाही, लढणार असंही त्यांनी बोलताना स्पष्ट केलं आहे. (Sanjay Raut on devendra Fadnavis and bjp)

आज मुंबईत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजपवर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदरांवार राऊतांनी निशाणा साधला. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद लाभले असते तर आज तुम्ही मुख्यमंत्री असता. बाळासाहेब ठाकरेंच नाव हे आग आहे, त्यामुळे आगीशी खेळण्याचा प्रयत्न करु नका. आतापर्यंत ज्यांनी आगीशी खेळण्याचा प्रयत्न केलाय त्यांचे केवळ हात नाही तरी राजकीय कारकीर्दही पोळली आहे, असंही सांगत त्यांनी भाजप नेत्यांना थेट इशारा दिला आहे. (maharashtra politics)

पुढे ते म्हणाले, नव्या सरकारला जनता स्वीकारणार नाही. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पुढे नेणार आहे. हीच शिवसेना भविष्यात राज्याचं नेतृत्व करेल, असा विश्वसही त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राच्या मातीत संत तुकारामांचे अभंग चालतात, मंबाजींचे नाही, असा दाखल देत राऊतांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवली आहे. शिवसेनेच्या पाठीत अनेकांनी वार केलेत. मात्र ते वार पचवून शिवसेना पुन्हा नव्याने उभी राहिली आहे.

चाळीस आमदारांच्या गटाला तुम्ही आज जर मुख्यमंत्री पद देत आहात, तर मग २०१९ साली शिवसेना हक्काची मागणी करत असताना तेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला तुम्ही का नाकारलं असा सवालही राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. तेव्हा हे सर्व बंडखोर आमदार पक्षात होते. तेव्हा बाळासाहेबांची असली शिवसेना आठवली नाही का?, असा सवालही त्यांनी केला आहे. शिवसेना फोडल्यानंतर मराष्ट्रात सुरु असणारी ढोंग बंद करा, असे खडे बोलही राऊतांनी सुनावले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT