Sanjay Raut on Rebel MLA's esakal
महाराष्ट्र बातम्या

नेमके हेच घडले!, तीन शब्दांतच राऊतांचा बंडखोरांना चपराक

राऊतांनी एक कॅरीकेचर ट्वीट करत अप्रत्यक्षरित्या एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना टोला लगावलाय

सकाळ डिजिटल टीम

राऊतांनी एक कॅरीकेचर ट्वीट करत अप्रत्यक्षरित्या एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना टोला लगावलाय

एकनाथ शिंदे यांनी चाळीसहून अधिक आमदार सुरुवातीला सुरत आणि त्यानंतर गुवाहाटीला घेऊन जात बंड केलं. त्यामुळं राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) अल्पमतात आलं होतं. काल रात्री उशीरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, आता यावरून खासदार संजय राऊत यांनी एक ट्वीट केलं आहे. राऊतांनी एक कॅरीकेचर ट्वीट करत अप्रत्यक्षरित्या एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना टोला लगावला आहे. (Sanjay Raut on Rebel MLA's)

खासदार राऊत यांनी फक्त तीन शब्दांचं कॅप्शन या कॅरीकेचरला दिले आहे. ते म्हणाले की, नेमके हेच घडले!. या कॅरीकेचर मध्ये एक व्यक्ती पाठमोरा दाखवला आहे आणि त्याच्या पाठीवर मागून वार केललं हे कॅरीकेचर ट्वीट करत त्यांनी शिंदे गटातील आमदारांना जाणिव करुन दिली आहे.

काय म्हणाले काल मुख्यमंत्री ठाकरे?

उद्या नव्या लोकशाहीचा पाळणा हलतोय. हा सोहळा जबरदस्त झाला पाहिजे. तुमच्या मार्गात कुणीही येणार नाही. तुम्ही या आणि घ्या शपथ घ्या. राज्यात कोणत्याही शिवसैनिकांनी गोंधळ घालू नये असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलं आहे. कोणत्याही शिवसैनिकाने नव्या सरकारच्या मधे येऊ नये, त्यांना त्यांचा गुलाल उधळू द्या असे म्हटले आहे. असे ठाकरे यांनी म्हटले आहेत.

शिवसेनाप्रमुखाच्या पोराला मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचण्याचं पुण्य त्यांना लाभणार आहे. मला पद जाण्याची खंत अजिबात नाही, बहुमतामध्ये मला रस नाही. केंद्राच्या सूचनेवरून मुंबईत सुरक्षा वाढवली जातेय. उद्या चीन सीमेवरील सुद्धा सुरक्षा मुंबईत येईल. यावेळी शरद पवार आणि सोनिया गांधींनी खूप सहकार्य केलं असे म्हणत मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT