eknath shinde and sanjay raut
eknath shinde and sanjay raut 
महाराष्ट्र

Sanjay Raut : मनोहर जोशी, लीलाधर डाकेंकडून निष्ठेच्या गोष्टी शिका; राऊतांचा CM शिंदेंना टोला

सकाळ डिजिटल टीम

'राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणत्या पक्षाच्या नियुक्त्या करत आहेत? त्यांना अधिकार काय आहे?'

एकनाथ शिंदेंकडून सध्या शिवसेनेतील शिवसैनिकांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या सुरु आहेत. दरम्यान, या मुद्द्यावरून आज खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारला धारेवर धरलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणत्या पक्षाच्या नियुक्त्या करत आहेत? त्यांना अधिकार काय आहे? असा प्रश्न उपस्थित करत राज्यात भातुकलीचा पोरखेळ चालला असून त्याकडे आम्ही गांभीर्याने पाहात नाही, असा टोला राऊतांनी लगावला आहे. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना इथेच असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

पुढे बोलताना राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंवर टीकेची झोड उठवली आहे. ते म्हणाले, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके आणि मनोहर जोशी हे बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्याबरोबर एक कडवट शिवसैनिक म्हणून अनेक कठीण प्रसंगात ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले सैनिक आहेत. अनेक वादळात, संकटात शिवसेना प्रमुखांबरोबर, शिवसेनेबरोबर ते निष्ठने राहिले आहेत. अशा कडवट शिवसैनिकांना मुख्यमंत्री भेटले ही चांगली गोष्ट आहे. नक्कीच त्यांच्यापासून त्यांना प्रेरणा आणि बोध मिळेल, असा टोमणा त्यांनी शिंदेंना मारला आहे.

पुढे शिंदे गटाला आव्हान देत राऊत म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जो वृक्ष वाढवला, ज्या सावलीमध्ये आपण मोठे झालो, फळं खाल्ली.. ठीक आहे आपण बाजुला झाला आहात. तुम्ही तुमचा दुसरा पक्ष स्थापन करा आणि अस्तित्व दाखवा, असंही ते म्हणाले आहेत.

राज्यात सत्तांतर होईल या मताशी मी ठाम आहे. ठीक आहे ते स्वप्न असेल, पण प्रत्येकाचे एक स्वप्न असते. कोणाला मिळेल त्या मार्गाने मुख्यमंत्री व्हायचे असते, परंतु आम्हाला महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता आणायची आहे. पण मिळेल त्या मार्गाने नाही, तर लोकांमध्ये जाऊन, लोकशाही मार्गाने आम्ही सत्ता आणू आणि ती वेळ लवकरच येईल, असेही राऊतांनी स्पष्टे केलं आहे.

ते म्हणाले, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यात दौरा करणे ही राज्यातील जनतेसाठी चांगली गोष्ट आहे. आज राज्यामध्ये ठिकठिकाणी महापूर आल्याने लोक वाहून गेली आहेत. शेतकरी आणि या पूरग्रस्तांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार विदर्भात आहेत. अजून महाराष्ट्रात मंत्रिमंडळाची स्थापना झालेली नाही. दिल्लीच्या वाऱ्या आणि फेऱ्या वाढल्या आहेत, त्यातून जर वेळ काढून मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या जनतेच्या समस्या समजून घेण्यासाठी फिरणार असतील तर ही सकारात्मक गोष्ट आहे, असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhanparishad Election : शिवसेना ठाकरे गटाकडून परब, अभ्यंकर

NASA : भारतीय अंतराळवीरांना आता ‘नासा’चे धडे; गार्सेटी यांची घोषणा

Loksabha Election 2024 : लोकांनी द्वेषाला धुडकावले; राहुल गांधी यांचे प्रतिपादन

Loksabha Election 2024 : ‘साखरेचा वाडगा’ काँग्रेससाठी कडू! देवरियात ओबीसी मतांवर भाजपची भिस्त

Narendra Modi : मतपेढीसाठी ‘इंडिया’चा मुजरा; मोदींची विरोधकांवर टीका

SCROLL FOR NEXT