devendra fadnavis eknath shinde ajit pawar 
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : फडणवीस मदारी, ते डमरू वाजतात अन् दोन माकडं नाचतात; ठाकरे गटाची जहरी टीका

रवींद्र देशमुख

मुंबई - राज्याचा कारभार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघे मिळून पाहात आहेत. मात्र यावरून विरोधक सातत्याने टीका करत आहेत. दोन दिवसांपूर्वीच अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यात आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले की. इथल्या सरकराच्या चड्डीचा नाडा दिल्लीत आहेत. ते कधीही नाडा घट्ट करतात. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री पळत दिल्लीला जातात. सरकारी रुग्णालयात दीडशेहून अधिक लोक रोज मरत आहेत. ही जबाबदारी सरकारची नाही का? कधीही विचारा मुख्यमंत्री कुठंय तर ते दिल्लीत अमित शहांना भेटायला जातात.

देवेंद्रजी मदारी है, और दो बंदर नाच रहे है...देवेंद्रजी बजा रहे है, ये नाच रहे है..., अशा शब्दात राऊत यांनी निशाणा साधला. तसेच यांच्या चड्डीचा नाडा दिल्लीत आहे, असंही राऊत यांनी नमूद केलं. हे सरकार ना फडणवीस, ना शिंदे, ना अजित पवारांनी आणलं. दिल्लीतील ईडीने हे सरकार आणल्याचा दावा राऊत यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhas River: धोक्याची घंटा! उल्हास नदीने गाठली इशारा पातळी; कल्याण-डोंबिवलीकरांवर पुराचे संकट, प्रशासनचा हाय अलर्ट

Driving Licence Rules : ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नियम बदलणार; बाईक, टॅक्सीसाठी १ ऑगस्टपासून अंमलबजावणीची शक्यता

Latest Marathi News Live Update : लोणावळ्यात २४ तासांत २८३ मिमी पावसाची नोंद

Gold Rate Today: सलग 5व्या दिवशी सोनं स्वस्त! 18 कॅरेट 1.08 लाखांवर; 22k आणि 24k सोनं किती रुपयांना?

Mumbai Heavy Rain : पावसााचा फटका! सलग चौथ्या दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; नेरळ-भिवपुरी रेल्वे रुळांवर पाणी, प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT