sanjay raut e sakal
महाराष्ट्र बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्यावर संजय राऊतांचे स्पष्टीकरण, म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने औरंगाबाद येथे एका कार्यक्रमात बोलताना 'आजी माजी आणि एकत्र आलो तर भावी सहकारी' असा उल्लेख केला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. चंद्रकांत पाटलांनी एक दिवसांपूर्वी 'माजी मंत्री म्हणू नका' असे म्हटले होते. त्यामुळे आता सेना-भाजप एकत्र येऊन युती होणार का? असा तर्क वितर्क लढविले गेले. त्यावरच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

शिवसेना ही दिलेल्या शब्दांची पक्की आहे. आपला शब्द कधीही मोडत नाही. कोणाच्याही पाठीत खंजिर खुपसत नाही. कोणाला उगाच पतंग उडवायची असेल त्यांनी ती उडवावी. ज्यांनी शिवसेना फोडण्याची भाषा केली, ज्यांनी उद्धव ठाकरेंबद्दल अपशब्द वापरले त्यांच्यासोबत हातमिळवणी होऊ शकत नाही, असे संजय राऊत म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भाषण करण्याची एक पद्धत आहे. त्यांची ती ठाकरे शैली आहे. त्यांनी नवीन आघाडी होईल असं कुठंही सांगितलं नाही. मात्र, भावी सहकारी व्हायचं असेल तर ते शिवसेनेत येऊ शकतात. कोणीतरी तिकडे आहे, ज्यांना इकडे यायचं आहे. त्यांच्यासाठीच उद्धव ठाकरेंनी संकेत दिले आहेत, असं स्पष्टीकरण संजय राऊतांनी दिले.

.अशा पक्षाशी हातमिळवणी कशी करू?

“ज्या पक्षातल्या लोकांनी शिवसेना भवन फोडण्याची भाषा केली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल अपशब्द काढतात, कानाखाली मारण्याची भाषा करतात, ही जी नवीन संस्कृती समोर आली आहे, अशा पक्षांशी आम्ही हातमिळवणी कशी करू शकतो?”, असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री नेमके काय म्हणाले होते?

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यावेळी औरंगाबाद येथे काही कार्यक्रम घेण्यात आले. अशाच एका कार्यक्रमाच्या मंचावर रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्र आले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच 'आजी माजी आणि एकत्र आलो तर भावी सहकारी', असा उल्लेख केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT