Sanjay Raut on Raj Thackeray  e skalal
महाराष्ट्र बातम्या

राज ठाकरे भाजपचा भोंगा, त्यांची अक्कल..., संजय राऊतांचा टोला

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी अल्टीमेटम (Raj Thackeray On Mosque Loudspeaker) दिला आहे. भोंगे उतरवले नाहीतर मनसे आणखी आक्रमक होईल, असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यावरून संजय राऊतांनी (Sanjay Raut) राज ठाकरेंवर टीका केली आहे. राज ठाकरे हे भाजपचा भोंगा आहेत. त्यांना भाजपने ईडी कारवाईची धमकी दिली होती. त्यामधून अभय मिळाल्यानंतर हे भोंगा प्रकरण सुरू झालं आहे, असं संजय राऊत म्हणाले.

राज ठाकरेंनी भोंग्यांसाठी अल्टीमेटम दिला आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले, राज्य सरकारला अल्टीमेटम कोणी देत नाही. अल्टीमेटम देण्याची ताकद फक्त बाळासाहेब ठाकरेंमध्ये होती. त्यांनी नेत्यांसह सर्वांना अल्टीमेटम दिला होता. मी वापरलेल्या शिवराळ भाषेचं काल कौतुक व्हायला पाहिजे होतं. कारण ती मराठी भाषा होती. त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला असता, तर त्यांचं खरं मराठी प्रेम दिसलं असतं. दुसऱ्या पक्षाने तुमच्या तोंडाला भोंगा लावला आहे. ईडी कारवाईतून मुभा दिल्यानं तुमचा भोंगा वाजतोय. तुमची अक्कल गेल्या दीड वर्षांपासून ईडी कार्यालयात गहाण पडलीय, अशी जोरदार टीका संजय राऊतांनी राज ठाकरेंवर केली.

मी किरीट सोमय्याविरोधात शिवराळ भाषा वापरली आहे. किरीट सोमय्यांनी अनेक वर्षांपासून मराठीविरोधी भूमिका घेतली आहे. हा माणसू मराठीविरोधी आहे. सोमय्याबाबत वापरलेल्या शिवराळ भाषेचा शिवसेनेला गर्व आहे. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, आम्ही असं होऊ देणार नाही. मराठी जनता मला किरीट सोमय्यांना दिलेल्या शिव्यांबद्दल माफ करेल. किरीट सोमय्याला तुमच्या शिवतिर्थ बंगल्यावर बोलवा आणि त्याचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करा, अशी टीका संजय राऊतांनी राज ठाकरेंवर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT