Sanjay Raut on Kirit Somaiya  e sakal
महाराष्ट्र बातम्या

'बात निकलेगी तो फिर दूर तक जायेगी'; राऊतांचा सोमय्यावर निशाणा

सोमय्या यांनी आपल्यावर खोटे आरोप लावले असं सांगत कोर्टात मानहानीची याचिका दाखल केली आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपाचे किरीट सोमय्या यांचा वाद दिवसेंदिवस वाढतंच चालला असून आरोप प्रात्यारोपाचे सत्र चालू आहे. दरम्यान सोमय्या यांनी आपल्यावर खोटे आरोप लावले असं सांगत राऊतांविरोधात कोर्टात मानहानीची याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर २६ मे रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान संजय राऊतांनी ट्वीट करत भाजपाचे किरीट सोमय्या यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे. (Sanjay Raut on Kirit Somaiya)

संजय राऊत यांनी युवक प्रतिष्ठानच्या विरोधातील तक्रारपत्र ट्वीट करत त्यांच्यावर निशाणा साधत म्हटलंय की, "बात निकलेगी तो फिर दूर तक जायेगी.. किरीट सोमय्या आणि फॅमिलीला कोट्यावधी रुपयांच्या देणग्या कोण देत आहेत?" असा सवाल करत, "युवक प्रतिष्ठानच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी होईल आणि ब्लॅकमेलर जेलमध्ये जाणार..." असं म्हणत त्यांनी सोमय्या कुटुंबियांना धारेवर धरलंय.

कोर्टात दाखल केलेल्या तक्रारीच्या पत्रकाचे दोन फोटो पोस्ट करत खासदार राऊतांनी या सर्व प्रकरणाचा हिसाब देना पडेगा... म्हणत सोमय्या कुटुंबियांवर निशाणा साधला आहे. दरम्यान सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला येत असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या देणग्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. युवक प्रतिष्ठानला पश्चिम बंगालमधील एका डेअरीकडून देणग्या आल्याचा आरोप राऊतांनी केला. त्यानंतर किरीट सोमय्या यांच्या पत्नीने राऊतांवर १०० कोटींच्या मानहानीचा दावा दाखल केला आहे. आता हे आरोप प्रत्यारोपाच्या प्रकरणाला कोणतं वळण मिळतंय हे बघावं लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Accident: बारावीच्या पेपरला जाताना काळाचा घाला; टिप्परच्या धडकेत बाप-लेकीचा मृत्यू

Electric Vehicles : इलेक्ट्रिक वाहनांचा वाढला दबदबा; जानेवारीत ई-कार, दुचाकींच्या मागणीत वाढ

Widow Pension Fraud : महिलेचा अजब कारनामा ! पतीकडून वसूल करतेय पोटगी अन् शासनाकडून विधवा पेन्शन, नेमकं प्रकरण काय?

Emotional HSC Exam Story : आईचा मृतदेह घरात असताना मुलीने दिला बारावीचा पेपर; मन सुन्न करणाऱ्या घटनेने गावकरी हेलावले

RERA : ‘रेरा’ बंद करण्यासही आमचा आक्षेप नाही; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

SCROLL FOR NEXT