Sanjay Raut  e sakal
महाराष्ट्र बातम्या

संजय राऊतांचं ईडीविरोधात PM मोदींना पत्र; पत्रकार परिषदेत करणार खुलासा

टप्प्याटप्प्यानं काही गोष्टी बाहेर काढणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ईडीविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. हे पत्र ते आज संध्याकाळी पत्रकार परिषदेत सार्वजनिक करणार आहेत. त्याचबरोबर ईडीच्या कारवायांसंदर्भात टप्प्याटप्प्यानं काही गोष्टी समोर आणणार आहेत, अशी माहिती स्वतः राऊत यांनी दिली. (Sanjay Raut letter to PM Modi against ED Will reveal in press conference)

राऊत म्हणाले, "जे सत्य आहे जो अन्याय आहे, त्याविरोधात बोलल पाहिजे. विरोधी पक्षातील काही प्रमुख लोकांच्या भ्रष्टाचार आणि घोटाळे समोर आणले पाहिजेत. हे लोकांसमोर आणण्याला टार्गेट म्हणू नका. काही विशिष्ट लोक आमच्यावरती हल्ले करतात आणि त्याचवेळेला मोठंमोठे घोटाळे करुन नामनिराळं राहतात. त्यांचे मुखवटे फाडले पाहिजेत"

त्याचबरोबर ईडी संदर्भातही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे १३ पानाचं पुराव्यासह एक पत्र दिलं आहे. अनेक पत्रकारांचा आग्रह आहे की, मी हे पत्र मीडियासमोर, देशासमोर ठेवावं. त्यानुसार हे पत्र मी आज मीडियाला देईन. टप्प्याटप्प्यानं विरोधकांचे घोटाळे बाहेर काढणार आहे. यातला आज पहिला भाग बाहेर येईल, असंही यावेळी संजय राऊत यांनी सांगितलं.

दरम्यान, आज (मंगळवार) संध्याकाळी ४ वाजता संजय राऊत शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते काय खुलासे करतील याची अनेकांना उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळणार 12,000 शिष्यवृत्ती; वार्षिक उत्पन्न 3.50 लाख रुपये अन्‌ आठवीत पाहिजे ५५ टक्के गुण

मोठी बातमी! दारूचे दर वाढले अन्‌ विदेशी दारूचा खप झाला कमी; बनावट दारू व हातभट्टीची वाढली विक्री; दुकानदारांकडूनही हिशेबात चलाखी, वाचा...

सातारा जिल्ह्यात खळबळ! 'यशवंत बँक अपहार प्रकरणी चरेगावकरांच्या बंधूला अटक'; ईडीच्या हाती लागली महत्वाची कागदपत्रे..

Police constable molests student on train Video : रेल्वेत झोपेचं सोंग घेवून शेजारी बसलेल्या विद्यार्थीनिचा विनयभंग करणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबलला अटक!

Pune News : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीला ईपीएफओचा दणका; १२० कोटी ९० लाख रुपये पीएफ भरण्याचे आदेश!

SCROLL FOR NEXT