political esakal
महाराष्ट्र बातम्या

'कर नाही त्याला डर कशाला, राऊतांना आता लोकशाही आठवली का?'

खासदार राऊत यांनी पाठवलेले पत्र पाहिल्यानंतर त्यांची केवळ कीव वाटते.

सकाळ डिजिटल टीम

खासदार राऊत यांनी पाठवलेले पत्र पाहिल्यानंतर त्यांची केवळ कीव वाटते.

शिवसेनेचे संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Vaikayya Naidu) यांना पत्र लिहून नवा खुलासा केला आहे. राऊत यांनी राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहले आहेत. आता या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोपप्रत्यारोप सुरु झाले आहेत. दरम्यान, आता राऊतांच्या या पत्रावरून भाजपचे अतुळ भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी टीका केली आहे. (Sanjay Raut Letter)

ते म्हणतात, खासदार राऊत (Sanjay Raut) यांनी पाठवलेले पत्र पाहिल्यानंतर त्यांची केवळ कीव वाटते. कालपर्यंत देशाचे पंतप्रधान आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना अर्वाच्य, घाणेरड्या भाषेत बोलणाऱ्या राऊतांनी आता ईडीला (ED) सामोरे जावावे. कर नाही त्याला डर कशाला पाहिजे. या सगळ्यानंतर राऊतांना लोकशाही आठवायला लागलीय का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

पुढे ते म्हणाले, राऊत साहेब काळजी करू नका. ईडी तुमची चौकशी करेल ती कायद्यानुसार करेल. आपण तथाकथित बोगस डिग्रीच्या नावाखाली एका महिलेला 47 दिवस तुरुंगात पाठवले होते. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांच्यावर सामनामधून त्यांच्या शारीरिक व्यंगावर हल्ला केला होता. तुम्हाला आता लोकशाही आठवते का? त्यावेळी लोकशाही कुठे गेली होती, असा प्रश्नही आमदार भातखळकर यांना उपस्थित केला आहे.

दरम्यान, ईडीचा वापर महाराष्ट्रातील (Maharashtra) सरकार पाडण्यासाठी (Mahavikas Aaghadi Govt.) होत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे. दोन मंत्र्यांचा राजीनामा आणि सरकार पाडण्यासाठी दबाव येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यासंबंधी ते लवकरच पुरावे सादर करणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. यावरून राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनीही फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: हिंसक कारवाईची मोठी किंमत! हत्याकांड प्रकरणी शेख हसीना दोषी; बांगलादेश न्यायालयाकडून मृत्युदंडाची शिक्षा

Latest Marathi Breaking News:विहिरीत पडला बिबट्या, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Ironman Competition: 'पांगरीच्या अजय दडस यांचे आयर्नमॅन स्पर्धेत यश'; गोव्यातील स्पर्धेत ३३ देशांतील सुमारे १३०० खेळाडू सहभागी

Viral Jugaad Video : चाक नसतानाही सुस्साट धावू लागला टेम्पो, जुगाडाचा बादशहा ठरला ड्रायव्हर; व्हिडिओ पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Pushkar Singh Dhami : सीएम धामींनी संरक्षण मंत्र्यांसमोर ठेवल्या सामरिक महत्त्वाच्या मागण्या; नंदा राजजात यात्रेच्या मार्गावरही केली चर्चा

SCROLL FOR NEXT