sanjay raut on court reject kirit Somaiya anticipatory bail application in ins Vikrant case  Sakal
महाराष्ट्र बातम्या

सोमय्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला; संजय राऊत म्हणतात, "बाप बेटे…"

सकाळ डिजिटल टीम

सध्या राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. इडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई केल्यानंतर राऊत यांनी देखील भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) यांच्यावर आयएनएस विक्रांत (INS Vikrant) निधीत घोटाळा केल्याचे आरोप केले होते. या प्रकरणात आज किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला, त्यानंतर संजय राऊत यांनी "बाप बेटे जेल जायेंगे.." अशी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत किरीट सोमय्या यांनी घोटाळा केल्याच्या आरोपांनंतर याप्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

यानंतर किरीट सोमय्या यांनी अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान किरीट सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडली. यामध्ये न्यायालयाने किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असून, नील सोमय्या यांच्या अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार लटकत आहे.

दरम्यान या निकालानंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे, राऊत यांनी ट्विट करत, "बाप बेटे जेल जायेंगे.. अनिल देशमुख, नवाब मलिक के बाजुके ही कोठडी मे रहेंगे.." असं म्हटलं आहे. त्यांनी सोबत एक फोटो देखील पोस्ट केला आहे. ज्यावर 'आग लगाने वालो को कहां खबर, रुख हवाओं ने बदला, तो खाक वो भी होंगे..' असा मजकूर लिहिलेला आहे. त्यामुळे या प्रकरणात सोमय्या यांना अटक होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

नंतर माध्यमांशी बोलताना देखील राऊत यांनी किरीट सोमय्या आणि भाजपला धारेवर धरलं . त्यांनी, भाग सोमय्या भाग हा नवीन सिनेमा काश्मीर फाइल्स वाल्यांनी काढायला हवा असा टोला लगावत, कायद्याचं पालन करण्याबाबत लोकांना ज्ञान देताय, मग तुम्ही का पळताय असा सवाल सोमय्या यांना केला. ते पुढे म्हणाले की, ज्या आयएनएस युध्दनौकेमुळे पाकिस्तानचा पराभव करु शकलो, ती जतन करावी यासाठी सगळ्यांनी भूमिका मांडली होती. पण ते होऊ शकलं नाही. त्यानंतर यांनी पैसे गोळा करायला सुरुवात केली असे म्हटले.

राऊतांनी यावेळी बोलताना सांगितले की, विक्रांत वाचवण्यासाठी ७११ डबे फिरवले, या शिवाय सेव्ह विक्रांतच्या नावावर अनेकांकडून पैसे घेतले. त्यांच्या ट्विट नुसार १४० कोटी तेव्हा राजभवनात गोळा करु अशी भुमिका होती. राजभवनाचं अकाउंट नसल्यामुळे हे पैसे भारपच्या खजीन्यात जमा केले. मग मुख्यमंत्री निधीत किंवा केंद्राकडं द्यायचे. ते तुम्ही पक्षाकडं दिले. त्यांनी यातली मोठी रक्कम निवडणूकीत वापरली असा आरोप राऊतांनी केला आहे. तर उरलेले पैसे हे नील सोमय्या यांच्या निकॉन इन्फ्रा या कंपनीत पीएमसी बॅंकेत व्हाईट करुन तिथे वळवले. सरकारी यंत्रणा जेव्हा त्यांन ताब्यात घेतील तेव्हा बाहेर येईल. असे संजय राऊत म्हणाले.

आता किरीट सोमय्या आणि भाजपने मिळून हा घोटाळा केला का पक्ष निधीसाठी हा घोटाळा केला का याचा तपास झाला पाहिजे. हा देशद्रोह आहे. भाजपकडं जमा केलेल्या पैशांच पक्षानं काय केलं? किरीट सोमय्या हा एक ब्लॅकमेअर आहे, हा एक आर्थिक माफिया टोळी चालवतो, ईडीच्या धमक्या देऊन व्यापारी, बिल्डरांकडून पैसे काढतात. यामागं मोठं रॅकेट आहे. अशी अनेक प्रकरणे रांगेत आहेत आणि त्यांचा संबंध भाजपशी आहे असे राऊत म्हणाले.

सोमय्या पिता-पुत्र भाजप शाषित राज्यात लपले आहेत, एकतर ते गोव्यात किंवा गुजरातमध्ये आहेत, महाराष्ट्राला हव्या असलेल्या गुन्हेगारांना आश्रय मिळतो असे राऊत म्हणाले. त्यांना अटक करुन मुंबई पोलिसांच्या ताब्यात देणे गरजेचे असून कालपासून खोटे कागद बनवायचा प्रयत्न सुरु आहे. पण न्यायालयात काही रामशास्त्री आहेत, असे राऊत यांनी सुनावलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Name Change Demand : आता थेट दिल्लीच्याही नावात बदल होणार? ; मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना 'या' व्यक्तीने पाठवलंय पत्र!

Balapur News : भिंत कोसळून आठ वर्षीय चिमुकला ठार; गावावर शोककळा

Women's World Cup 2025: भारताचा बांगलादेशविरुद्ध सामना पावसामुळे रद्द! साखळी फेरी संपली पाँइट्सटेबलमध्ये कोण कोणत्या स्थानी?

Tejashwi Yadav on Waqf Act : ‘’…तर आम्ही ‘वक्फ कायदा’ कचऱ्याच्या डब्यात टाकू’’ ; तेजस्वी यादव यांचं मोठं विधान!

Mohol Politics : अखेर ठरलं! सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील व माजी आमदार यशवंत माने यांचा बुधवारी हजारो कार्यकर्त्यासह भाजपात होणार प्रवेश

SCROLL FOR NEXT