sanjay raut
sanjay raut esakal
महाराष्ट्र

Karnataka Border Dispute : धमकी देतो, महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहायचं नाही - संजय राऊत

सकाळ डिजिटल टीम

कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्या सीमावाद आता पुन्हा एकदा उफाळून आला आहे. आता महाराष्ट्र सरकारकडून हा तिढा सोडवण्यासाठी पावलं उचलण्यात येत आहेत. दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगतील्या जत तालुक्याचीही मागणी केली आणि त्यानंतर हा प्रश्न पुन्हा पेटलाय. त्याचसंदर्भात संजय राऊतांनी कर्नाटक सरकारला थेट धमकी दिली आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या मागणीनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला एकही गाव मिळणार नाही, असं ठाम शब्दांत सुनावलं आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डी दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांनी ज्योतिषाची भेट घेतल्यावरुन वाद पेटण्याची शक्यता आहे. अशातच राज्यातलं सरकार कमजोर असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, "महाराष्ट्रात कमजोर सरकार आहे, सरकारचे प्रमुख देवधर्म तंत्रमंत्र ज्योतिषात अडकलेत, त्यामुळे गुजरात, कर्नाटक अशा अन्य राज्यांतून महाराष्ट्रावर हल्ले होतायत, कोणी गावं पळवतंय कोणी उद्योग. पण सरकार त्यावर ठामपणे भूमिका घेत नाहीये. आता कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी वर्मावर घाव घातलाय. आत्तापर्यंत असं बोलायची कोणाचीही हिंमत झाली नव्हती.

हेही वाचा - मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

राऊत पुढे म्हणाले, "कर्नाटकात भाजपाचं सरकार आहे, राज्यातही भाजपाचंच सरकार आहे. तरीही हा वाद सुरू आहे. गुजरातने उद्योग पळवायचे आणि कर्नाटकने गावं पळवायची,आणि महाराष्ट्राला या देशाच्या नकाशावरुन पुसून टाकायचं असा कट चालला असल्याची मला भिती वाटतेय. राज्याचं आराध्य असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांवर हल्ले करायचे आणि आमचं मनोबल खच्ची करायचं, असं नियोजन चाललंय का, अशी भीती आता मला वाटू लागली आहे.

शिवसेनेला या प्रश्नासाठी रक्त सांडण्याची भीती नाही. शिवसेना राज्यावरचं प्रत्येक संकट परतवून लागेल, असंही राऊत म्हणाले आहेत. ते म्हणाले, "शिवसेना राज्यावरचं प्रत्येक संकट परतवून लावेल. शिवसेनेला रक्त सांडण्याची भीती नाही. वेळप्रसंगी आम्ही या लढाईसाठी तुरुंगवास भोगू. बोलत नाही, धमकी देतोय, महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा. आम्ही आजही शांत आहोत, संयमी आहोत. हे सरकार सिलेंडर वर करून गुडघ्यावर बसलं असलं तरी शिवसेना खंबीर आहे. मी वारंवार सीमाभागात गेलो आहे, आता परत जाईन. आत्तापर्यंत सरकारमधले किती मंत्री गेले? पण आम्ही जाणार, लढणार कोणाची पर्वा करणार नाही. या ४० आमदारांचा स्वाभिमान कुठे शेण खातोय. षंढासारखे बसला आहात तुम्ही."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : व्यंकटेश अय्यर - मनिष पांडेने केकेआरचा डाव सावरला; 15 षटकात मारून दिली चांगली मजल

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT