Sanjay Raut on Kirit Somaiya sakal
महाराष्ट्र बातम्या

फडणवीस असं करणार नाहीत, एक दिवस लोक सोमय्यांची धींड काढतील - राऊत

सकाळ डिजिटल टीम

काय चाललंय महाराष्ट्रात? कागदपत्रे घेऊन मी मुख्यमंत्र्यांना भेटायला निघालो असल्याचंही संजय राऊत म्हणाले.

मुंबई - महाराष्ट्राच्या महाआयटीत २५ हजार कोटींचा घोटाळा झाला. त्यातील आरोपीला देशाबाहेर पळून जाण्यात त्यांनी मदत केली. पवईचे लोकही काही आहेत, तिथे किरीट सोमय्या जो दलाल आहे ज्याच्या हातात चप्पल आहे तो स्वत:लाच मारून घेणार आहे. महाराष्ट्रातील लोक एक दिवस त्याची धिंड काढणार आहेत. (Sanjay Raut on Kirit Somaiya)

पुनर्वसनाच्या नावाखाली ३८ एकरचा भूखंड घोटाळा करून ४३३ बोगस लोकांना त्यात घुसवलं. ज्यांचा त्यावर अधिकार नाही, एजंटचा वापर करून घोटाळा केला. माझ्याकडे याची कागदपत्रे आहेत. त्यांना धमक्या देण्यात आल्या. ४३३ लोकांकडून २५-२५ लाख रुपये एजंटमार्फत घेतल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला.

फडणवीसांच्या नावानेही सोमय्या यांनी वसुली केल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला. ही वसुली ३०० कोटींची होती आणि यासंदर्भातली कागदपत्रे मी संबंधित तपास यंत्रणांकडे देणार आहे. तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावाने अनेकांनी शेकडो कोटींची वसुली केली असंही राऊत म्हणाले.

बेगाने शादी मे दिवाने होऊ नका असा टोला राऊतांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला. फडणवीसांकडून असं काम होणार नाही असं मी तेव्हाही म्हणालो होतो. पण त्यांच्या नावाने वसुली केली गेली असा आरोप संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

काय चाललंय महाराष्ट्रात? कागदपत्रे घेऊन मी मुख्यमंत्र्यांना भेटायला निघालो आहे. दररोज एक भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येत आहेत. गेल्या काही वर्षात साडे सात हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला.फडणवीस यांना या सगळ्याची कल्पना असेल असं वाटत नाही असं म्हणत राऊतांनी सोमय्यांवर अनेक आरोप केले. कोट्यवधी रुपयांची वसुली केल्याचं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Rawat: 'गजनी' फेम अभिनेते प्रदीप रावत यांचं निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

School Row: भोलागीर शाळेचा राजकीय वापर थांबवा; मराठी माध्यम शाळेची मागणी, आयुक्तांना कायदेशीर नोटीसचा इशारा

RTO Portal Glitch: आरटीओच्या नव्या वाहन पोर्टलमुळे सेवा ठप्प, तांत्रिक अडचणी दूर करण्याची मोटार वाहन मालक-चालक संघाची मागणी

'होर्मुज'वर काही तासांत तोडगा निघणार? करार झाल्याचा अमेरिकेचा दावा; मध्यपूर्वेतील तणाव कमी होण्याची शक्यता

Digital Arrest: ‘डिजिटल ॲरेस्ट’च्या नावाने ज्येष्ठ नागरिकाला १९.४५ लाखांचा गंडा; सायबर चोरट्यांविरुद्ध डेक्कन पोलिसांत गुन्हा

SCROLL FOR NEXT