Sanjay Raut सकाळ डिजिटल टीम
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्राने जपून रहावं! किती चिकन घेतलं याकडे भाजपचं लक्ष; ईडीला कळवतील

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: संजय राऊत यांनी आज माध्यमांसमोर येत मनसेच्या लाऊडस्पीकर उपक्रमावर आपलं मत मांडलं आहे. तसेच भाजप ईडीचा गैरवापर करत असल्याचा पुनरुच्चारही खोचक पद्धतीने केला आहे. महाविकास आघाडीतल्या धुसफुसीबद्दल संजय राऊत यांचं वक्तव्य केलंय.

संजय राऊत यांनी म्हटलंय की, एखादा दुसऱ्या पक्षाचा पालकमंत्री असेल तर तो अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करतो. अशा तक्रारी आहेत. यावर तोडगा काढावा लागेल. कारण प्रत्येक मंत्र्यानं फक्त घटक पक्ष नव्हे तर मविआचा घटक म्हणून काम केलं पाहिजे. पालकमंत्री कोणत्याही पक्षाचा असला तरी तिन्ही पक्षांचं काम झालं पाहिजे, असं त्यांनी म्हटलंय. हा प्रत्येक पालकमंत्र्यासाठी हा इशारा आहे. सरकार तीन पक्षांचं आहे, हे कुणीही विसरता कामा नये, असंही त्यांनी म्हटलंय.

मंत्रिमंडळातील फेरबदलाबाबतचा निर्णय सर्वोतपरी मुख्यमंत्र्यांचा आहे. सर्वपक्षीय आमदारांना चहापानाचं आमंत्रण देण्यात आलं आहे. आम्ही राजकीय, जातीय, धार्मिक फाळणीच्या विरोधात आहोत. आम्ही सगळ्या आमदारांना आमंत्रण दिलं आहे. आमच्या हृदयामध्ये सगळ्यांसाठी प्रेम आणि आस्था आहे. पुढे त्यांनी राज्यपालांवरही टीका करताना त्यांनी म्हटलंय की, आम्ही राज्यपालांशी संघर्ष करत नाही, तर संघर्ष करण्याची इच्छा त्यांची आहे.

मनसे-भाजपवर टीका

हायकोर्टाचा आदेश असूनही अनेक ठिकाणचे भोंगे हटवले नाहीयेत. यूपीतले भोंगे आहे तसे आहेत. गोव्यातले आहेत. काल गृहमंत्र्यांनी स्पष्ट आदेश दिले असून त्याचं पालन होणं गरजेचं आहे. तुम्ही भाजीची जुडी घेतली तरी भाजपचं तुमच्यावर लक्ष आहे. तुम्ही चिकनच्या दुकानात जरी गेलात तर काल किती घेतलं आणि आज किती घेतलं यावर भाजपचं लक्ष आहे. ताबडतोब ते इडीला कळवतील, त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेनं सावध राहिलं पाहिजे, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Property: हे कोणालाही अपेक्षित नव्हतं! मुंबईत एवढ्या वेगाने घरे का विकत घेत आहेत? प्रॉपर्टी मार्केटने मोडले सर्व रेकॉर्ड

Rahu Gochar 2026: नवीन वर्षात राहू दोनदा भ्रमण करेल, 'या' 3 राशींचा वाढेल स्ट्रेस

Latest Marathi News Live Update : उमेदवारांसह हजारो समर्थकांचं भवितव्य मतपेट्यांमध्ये लॉक

MLA Amol Khatal: संगमनेर नगरपरिषद निवडणुकीत महायुतीचा महाविजय निश्चित : आमदार अमोल खताळ; विकासाची गती तीन पटीने वाढली

Balasaheb Thorat : ईव्हीएमबाबत ते काहीही करू शकतात: बाळासाहेब थोरात; आयोगाचे सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम !

SCROLL FOR NEXT