Sanjay Raut Sakal
महाराष्ट्र बातम्या

शिवसेनेच्या नव्या पक्ष चिन्हाबाबत संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या नव्या चिन्हाची तयारी ठेवा असे कार्यकर्यांना सांगितले असल्याची चर्चा रंगली आहे.

धनश्री ओतारी

सत्तानाट्यानंतर मविआ सरकार कोसळले. आणि एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस यांचे नवं राज्य आलं. दरम्यान, पक्षबांधणीसाठी शिवसेना खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. दरम्यान, राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या शिवसेनेच्या नव्या पक्ष चिन्हाबाबत राऊतांनी यावेळी आपली भूमिका स्पष्ट केली.(Sanjay Raut on Shiv Sena new party symbol maharashtra politics)

हिंदूत्वावादी म्हणून घेणाऱ्या ४० जणांनी भूंमिका स्पष्ट करावी. जी पुन्हा उभी राहणार आहे ती खरी शिवसेना. मातोश्री माझी, शिवसेना माझी...असं म्हणाणाऱ्यांनी स्वतः सर्व निर्माण कराव. शिवसेना अजुनही भक्कम आहे. धनुष्यबाण हे शिवसेनेचे आहे आणि सेनेचेच राहणार अशी स्पष्ट भूमिका राऊत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटच पक्षाच्या ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाचा खरा दावेदार आहे. असे शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी म्हटले होते. त्यानंतर शिवसेना चिन्ह बदलणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली.

शिवसेनेने धनुष्यबाणाची आशा सोडली?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटच पक्षाच्या ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाचा खरा दावेदार आहे. असे शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी कायद्याच्या लढाईत अपयश आल्यास गाफिल राहू नका, पक्षाच्या नव्या चिन्हाची तयारी ठेवा. जे नवे निवडणूक चिन्ह येईल ते स्वीकारून लवकरात लवकर त्याची पूर्वतयारी करण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याचे समजते.

“माझी प्रकृती ठीक असल्याने आता आम्ही शिवसेना भवनात दररोज उपलब्ध आहोत,” असे सांगत त्यांनी पदाधिकाऱ्यांना विरोधकांशी हस्तांदोलन करण्यास तयार असल्याचे संकेत दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT