मुंबई : पत्राचाळ प्रकरणी ईडीकडून संजय राऊत यांना आज चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्य बजावण्यात आले होते. मात्र, राऊत सध्या पावसाळी अधिवेशनासाठी दिल्लीत आहेत. त्यामुळे ते आज चौकशीला हजर राहू शकले नाही. दरम्यान, या प्रकरणी चौकशीला हजर राहण्यासाठी राऊतांनी 7 ऑगस्टपर्यंतचा वेळ मागितला आहे. यापूर्वी दोन वेळा राऊतांची चौकशी झाली आहे. यापूर्वी याच प्रकरणात प्रवीण राऊत यांची यापूर्वी ईडीसमोर चौकशी झाली आहे. प्रवीण राऊत हे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात.
मुंबईतील १ हजार ३९ कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे.
याच वर्षी एप्रिल महिन्यामध्ये ईडीने या प्रकरणात संजय राऊत यांच्या अलिबागमधील ८ प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई ईडीने केली होती. ईडीने यापूर्वी ११ कोटी १५ लाख ५६ हजार ५७३ रुपयांची स्थावर मालमत्ता या प्रकरणामध्ये अटॅच केली आहे. मनी लॉण्ड्रींग कायदा २०२२ अंतर्गत गोरेगावमधील पत्रावाला चाळ पुर्निविकास प्रकल्पामध्ये ‘मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्स’ने केलेल्या आर्थिक घोटाळ्यासंदर्भात ही कारवाई करण्यात आली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.