Sanjay Raut News esakal
महाराष्ट्र बातम्या

द्रौपदी मुर्मूंच्या दौऱ्यात मातोश्री भेटीचा कार्यक्रम नाही; संजय राऊत म्हणाले...

राष्ट्रपतीपदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज मुबंई दौऱ्यावर...

धनश्री ओतारी

सध्या देशातील राजकारणाकडे लक्ष लागले असून येत्या १८ जुलैला मतदान तर २१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज मुबंईत येणार असून भाजप आणि शिंदे गटाच्या आमदरांसोबत त्यांची बैठक होणार आहे. तसेच, मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेणार का? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी द्रौपदी मुर्मूंच्या दौऱ्यात मातोश्री भेटीचा कार्यक्रम नाही असे स्पष्ट केले. (Sanjay Raut presidential election draupadi murmu mumbai tour uddhav thackeray )

राष्ट्रपतीपदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. तशी घोषणाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. अशातच मुर्मू यांच्या आजच्या मुंबई दैऱ्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

यावर भाष्य करताना, त्या मातोश्रीवर येण्यासाठी आम्ही पाठिंबा दिलेला नाही. आदिवासी महिला सर्वोच्च स्थानी जात असल्याने आमचा त्यांना पाठिंबा आहे. आमचा निर्णय राजकारणापलिकडचा आहे. त्यांना पाठिंबा देण्यामागे कोणतेही राजकीय भावना नाही. राजकीय गणित नाही. अशा शब्दात संजय राऊतांनी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे कारण स्पष्ट केले. तसेच, सेनेने याआधीही प्रतिभाताई पाटील मुखर्जी यांना पाठिंबा दिला आहे. आम्ही एनडीएचा भाग नाही. असेदेखील त्यांनी यावेळी सांगितले.

यासोबतच त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्र सध्या महापुरामुळे लॉकडाऊनमध्ये आहे. राज्याच्या पुरात १००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अतिवृष्टीमुळं उद्भवलेल्या परिस्थितीवर सरकारचं लक्ष नाही. शपथ घेतली म्हणजे सरकार अस्तित्वात असं होत नाही. महाराष्ट्र वाऱ्यावर आहे. मंत्रीमंडळ अस्तित्वात नाही. अधिकारी जागेवर नाहीत. असा आरोप करत राज्यापाल आता कुठे आहेत? असा सवाल राऊतांनी यावेळी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT