raj thackeray and sanjay raut raj thackeray and sanjay raut
महाराष्ट्र बातम्या

राज यांची नाव न घेता राऊतांवर टीका; ‘हे सगळे लवंडे’

सकाळ डिजिटल टीम

ठाणे : यांची प्रॉपर्टी जप्त केली तरं हे लोक पत्रकार परिषद घेऊन शिव्या देतात. भर पत्रकार परिषदेत भडवा, चिवत्या अशा शिव्या देतात. ईडीच्या (ED) कारवाईला हेच घाबरतात आणि मला शिव्या देतात. अशा लोकांना ‘लवंडे’ म्हणतात, असे राज ठाकरे (raj thackeray) यांनी सांगितले.

ईडीने (ED) काही दिवसांपूर्वी संजय राऊतांच्या (Sanjay Raut) कुटुंबीयांची चौकशी केली होती. यानंतर ईडीने मोठी कारवाई करीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची अलिबागमधील मालमत्ता ( Property) जप्त केली होती. यामुळे संजय राऊतांच्या अडचणीत वाढ झाली.

हेच लोक ईडीच्या कारवाईला घाबरतात. मला ईडीच्या कारवाईला घाबरून ट्रॅक बदलल्याचे म्हणतात. मी ईडीला घाबरत नाही. कोणत्याही कारवाईला समोर जाण्यास तयार आहे. काही चुकीचे केलं नाही तर घाबरण्याची गरजच नाही, असेही राज ठाकरे म्हणाले. हे एका पक्षाचे खासदार, एका वृत्तपत्राचे संपादक असताना पत्रकार परिषदेत शिव्या देतात, असेही संजय राऊत यांचे नाव घेता राज ठाकरे (raj thackeray) यांनी टोला हाणला.

संजय राऊत कुणाचे?

संजय राऊत हे शिवसेनेचे खासदार आहेत की राष्ट्रवादीचे काँग्रेसचे हेच समजत नाही. ते कधी इकडून बोलतात, तर कधी तिकडून बोलतात. नेहमी इकडे तिकडे लुडकत असतात. अशा लोकांना आमच्या आजोबांनी छान शब्द दिला आहे ‘लवंडे’ असेही राज ठाकरे (raj thackeray) म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT