sanjay raut reaction after demand Rights violation action 
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut: 'माझ्या भावना समजून घेतल्या पाहिजेत..'हक्कभंगाची मागणी होताच संजय राऊतांची प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

माझ्यावर हक्कभंग आणला असेल तर मी समितीसमोर जाईन. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतो. मी चोऱ्यामाऱ्या केल्या नाहीत. अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हक्कभंगाची मागणी होताच दिली आहे.(sanjay raut reaction after demand Rights violation action )

माध्यमांशी बोलताना राऊत यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर भाष्य करत सावरण्याचा प्रयत्न् केा आहे. सर्वोच्च सभागृहाचा मी सदस्य आहे. विधिमंडळ असो वा संसद या दोन्ही सभागृहाचा मी आदर केला आहे. राज्यसभेच्या कामकाजात सर्वाधिक काळ सहभागी होणारा मी सदस्य आहे. संसदीय लोकशाहीवर मी कायम विश्वास ठेवला आहे.

Sanjay Raut : मोठी बातमी! संजय राऊत यांच्यावर हक्कभंग दाखल; काय आहे कारण?

मुळात माझ्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. मी काय म्हणालो आणि कोणत्या संदर्भात म्हणालो हे समजून न घेता एकांगीपद्धतीने कारवाई होत असेल तर ते लोकशाहीला आणि लोकशाही परंपरेला धरून नाही असं त्यांनी म्हटलं.

तसेच, चोरांवर संस्कार नसतात. त्यांच्याकडून काही अपेक्षा करू शकत नाही. माझ्यावर हक्कभंग आणला असेल तर मी समितीसमोर जाईन. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतो. मी चोऱ्यामाऱ्या केल्या नाहीत.

Sanjay Raut controversial statement: संजय राऊतांविरोधात राज्य सरकार उचलणार मोठं पाऊल?

मी पक्षाचा नेता आहे. मी आयुष्यात कधीही घाबरलो नाही. न घाबरता तुरुंगवास भोगला. महागाई, बेरोजगारी, खोक्याचे राजकारण, शेतकऱ्यांच्या वीजेचा प्रश्न यावरून लक्ष हटवण्यासाठी संजय राऊतांना लक्ष्य केले. माझी पक्षप्रमुखांशी चर्चा झाली आहे. असही राऊतांनी यावेळी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Education Decision: राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय! आरटीई प्रवेशाची अंतराची अट अखेर रद्द; पालकांना २५ मार्चपर्यंत अर्जाची संधी!

CJI SuryaKant यांचा मोठा निर्णय! कोर्टातील ‘काळे कोट’ संपणार? नावही बदलणार, मोठा बदल लवकरच!

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या तपोवन वृक्ष तोडप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी

Beed Forest Department News: वन विभागात टक्केवारीचा खेळ; बोगस बिलांमुळे कोट्यवधींचा गैरव्यवहार?; सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा आरोप

Deepak Dalvi Death : मराठी अस्मितेचा ढाण्या वाघ हरपला! म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांचे निधन; काही महिन्यांपूर्वीच शरद पवार, जयंत पाटलांनी घेतली होती भेट

SCROLL FOR NEXT