संजय राऊत  
महाराष्ट्र बातम्या

त्यांचे घोडे त्यांच्या बाजारात; बैठकीनंतर राऊतांचे विधान

शिवसेनेचे उमेदवार संजय पवार पहिल्याच फेरीत निवडून येतील असा विश्वासह त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यसभेसाठीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता राज्यात राज्यसभा निवडणुकीवरून चांगलीच खलबतं सुरू झाली आहेत. दरम्यान, वर्षा बंगल्यावर पार पडलेल्या बैठकीनंतर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मविआचे सर्व उमेदवार आरामात निवडणून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे. घोडेबाजाराबद्दल प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, त्यांचे घोडे त्यांचा बाजारात असे म्हणत त्यांनी आम्हाला बाजारात उभं राहायची गरज नाही. आम्हाला पुन्हा बळ दाखवण्याची संधी मिळाल्याचेही राऊत यावेळी म्हणाले. (Sanjay Raut On Rajya Sabha)

राऊत म्हणाले की, शिवसेनेचे उमेदवार संजय पवार पहिल्याच फेरीत निवडून येतील असा विश्वासह त्यांनी यावेळी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवास्थानी महाविकास आघाडीतील सर्वच प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच आमचे सर्वच्या सर्व म्हणजेच चारही उमेदवार आरामात निवडून येतील असे सांगत महाविकास आघाडीकडे बहुमत असल्याचे ते म्हणाले. राज्यसभेची निवडणूक होत आहे आणि आम्ही ती स्वीकारलेली आहे असे म्हणत घोडेबाजार होणार नाही असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

या निवडणुकीमुळे पुन्हा आम्हाला आमचे बळ दाखवण्याची संधी मिळेल. आम्हाला हे बळ दाखवण्याची इच्छा नव्हती पण, विरोधी पक्षाला निवडणूक व्हावी असे वाटत आहे. पण एक लक्षात घ्या की, निकाल लागल्यानंतर त्यांना पश्चाताप होईल. महाविकास आघाडीचे चारही उमेदवार अगदी सहज निवडून येतील त्याबद्दल कुणीही चिंता करू नये तसेच अतिशहाणपणा करू नये असा सल्ला राऊत यांनी भाजपला नाव न घेता दिला आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये कुरघोडीचे राजकारण - आठवले

महाविकास आघाडी सरकारमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरु आहे. शिवसेना-काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यात अंतर्गत वाद आहेत. काँग्रेस पाठींबा ठेवायचा की नाही, यावर विचार करत आहे. काँग्रेसमध्ये धाडस दाखवत पाठींबा काढावा. आम्ही राज्यात सरकार बनवू. काँग्रेस खिळखीळी झाली आहे. काँग्रेसला नेता राहिला नाही. काँग्रेसला अध्यक्ष मिळेना, त्यामुळे नरेंद्र मोदी यांचा सामना करणे काँग्रेसच्या आवाक्यात नसल्याचे आठवले यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs ZIM : झिम्बाब्वेचा खळबळजनक विजय! ऑस्ट्रेलियाला १९ वर्षानंतर नमवले; सुपर कॅच, भन्नाट गोलंदाजी अन् सुरेख फलंदाजी...

Viral Video : अंगणात फिरणाऱ्या महाकाय अजगरावर बसली मुलगी, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

T20 World Cup: नोकरी सांभाळत स्वप्न जपलं… पिझ्झा विकणाऱ्या कृष्णने वानखेडेवर रचला इतिहास, दोन्ही बाजूंनी चेंडू फिरवण्याची कला

Bhante Surei Sasai Viral Video : भंते ससाई यांनी महिलेवर हात उगारल्याचा व्हिडिओ व्हायरल; विविध संघटना आक्रमक, अध्यक्षपदावरून हकालपट्टीची मागणी

Kolhapur crime News Today : घरातील पैशांच्या वादातून मुलाकडून वडिलांचा खून; कोल्हापुरातील शाहूवाडीमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT