Ajit Pawar - Sanjay Raut Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut on Ajit Pawar: अजित पवारांच्या टोल्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले, चुकीचं...

शिवसेनेच्या मुखपत्रातून राष्ट्रवादीला सल्ला देण्यात आला होता त्यावर अजित पवारांनी भाष्य केलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या भाजपसोबत जाण्याच्या चर्चांवर अखेर आज त्यांनीच पूर्णविराम दिला. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या मुखपत्रातून राष्ट्रवादीला सल्ला देणाऱ्या खासदार संजय राऊत यांनाही टोला लगावला. पवारांच्या या टोल्यावरच आता राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. (Sanjay Raut reaction on Ajit Pawar statement about writting in Samana about NCP)

अजित पवार म्हणाले, "काही राजकीय पक्ष जे सत्तेत आहेत त्यांच्या पायाखालची वाळू सरकते आहे. ते मविआमध्ये गोंधळ निर्माण करण्याचं काम करत आहेत. शिवसेनेच्या बाबतीत जे झालं तेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बाबतीतही करत आहेत, पण तुम्ही आता कितीही प्रयत्न केले तरी मविआला कोणताही तडा जाणार नाही. हे आज अजितदादा पवार यांनी स्पष्ट आणि परखडपणे सांगितलेलं आहे, जे सांगणं महत्वाचं होतं"

मी सामनातून त्यांच्यावर भाष्य केलं होतं त्यावरुन त्यांनी माझ्यावर टीका केली असेल असं मला वाटत नाही. पण अजितदादांविषयी जी बदनामी सुरु आहे त्यावर आम्ही भूमिका मांडली की, हे बरोबर नाही. पण जेव्हा शिवसेनेत फूट पाडण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा शरद पवारांसह अजित पवारांसह सर्वांनी एक भूमिका घेतली होती तीच भूमिका आम्ही राष्ट्रवादीबाबत घेतली तर त्यात चुकीचं काय आहे," असं राऊत यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडीचे आम्ही चौकीदार आहोत. मविआ टिकावी, वाढावी, भक्कम रहावी यासाठी आम्ही चौकीदारी करतो आहोत, त्यात अजित पवारही आहेत. भाजपची आमच्याविरोधात रोज कारस्थानं होत आहेत, ही कारस्थानं उधळणं आमची सर्वांची कामं आहेत, असंही यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT