Sanjay Raut on Devendra fadnavis e sakal
महाराष्ट्र बातम्या

फडणवीसांची अवस्था म्हणजे कोणी खुर्ची देता का... : संजय राऊत

सकाळ डिजिटल टीम

पणजी : संजय राऊतांना नटसम्राटाची भूमिका द्यायला पाहिजे. ते सकाळी वेगळं आणि संध्याकाळी वेगळं बोलतात. त्यांनी आधी नटसम्राटपणा थांबवावा, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी संजय राऊतांवर (Sanjay Raut) केली होती. त्यालाच आता खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे.

''गोव्याला रंगभूमीचा खूप मोठा वारसा आहे. नटसम्राटाचा महाराष्ट्राला मोठा वारसा आहे. महाराष्ट्रातले सर्व नटसम्राट हे गोव्यातून गेले आहेत. संगीत, कला, नाट्य ही गोव्याची भूमी आहे. फडणवीस गोव्याच्या जनतेचा, नाट्यकर्मींचा अपमान करतात. नटसम्राटमध्ये एक वाक्य आहे, कोणी मला घर देता का घर घर. अगदी तशीच फडणवीसांची अवस्था आहे. कोणी मला खुर्ची देता का खुर्ची अशी फडणवीसांची अवस्था आहे. नटसम्राट म्हटल्यानं मला वाईट वाटलं नाही. आम्ही रंगभूमीचे उपासक आहोत. मला आनंद आहे, की त्यांनी नटसम्राट म्हटलं. पण, आम्ही शब्द फिरवणारे सोंगाडे नक्कीच नाही'', असं जोरदार उत्तर राऊतांनी दिलं.

संजय राऊतांचे अश्रू मगरीचे आहेत. मनोहर पर्रीकर आजारी असताना ते काय बोलत होते? असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्याला देखील आता संजय राऊतांनी उत्तर दिले आहे. ''महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांविषयी तुम्ही बोलले आहात. त्यावेळी पर्रीकर सक्रीय नव्हते म्हणून बोलत होतो. पण, त्यांचं काही दुर्दैवी व्हावं अशी आमची भूमिका नव्हती. आम्ही इतके निर्दयी नाहीत. उत्पल पर्रीकर यांना तिकीट द्यायचं की नाही हा भाजपचा प्रश्न आहे. पण, ते स्वतंत्र लढले तर आम्ही उमेदवार नाही, असंही संजय राऊत म्हणाले.

'भाजप क्रमांक एकचा विरोधी पक्ष' -

भाजप हा नक्कीच क्रमांक एकच पक्ष आहे. पण, तो क्रमांक एकचा विरोधी पक्ष आहे. कारण त्यांच्याकडे १०५ आमदार आहेत. त्यांनी त्यांचं स्थान नगरपंचायतीत देखील कायम ठेवलं आहे. त्याबाबत त्यांचं अभिनंदन आहे, असंही राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतीय महिला संघाची 'ती' कृती अन् R Ashwin ने पुरुषांच्या संघाचे काढले वाभाडे; म्हणाला, ते फक्त प्रसिद्धीसाठी बाता मारतात, पण..

Pune News: पुणे जिल्ह्यात भीतीचा अंत! शिरूरमधील नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश जारी

Latest Marathi News Live Update : एक दिवस राज्य माझा ताब्यात द्या, ईव्हीएमचा घोळ बाहेर काढतो - आमदार उत्तम जानकर

Akkalkot News: 'अक्कलकोट तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींना मिळणार स्वतंत्र इमारत'; एक कोटी पाच लाख निधी मंजूर; आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा पुढाकार

Mumbai News : हाताला मेहंदी लावली म्हणून विद्यार्थीनीला वर्गातून बाहेर काढलं, पालकांची शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार....

SCROLL FOR NEXT