Sanjay Raut  Sanjay Raut
महाराष्ट्र बातम्या

संजय राऊतांचा घणाघात; आमचे नगरसेवक तर तुमचे नगरसेठ, नगरपिते

सकाळ डिजिटल टीम

नाशिकमध्ये शिवसेनेची सत्ता नसतानाही मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. याच्या दहा टक्के कामेही भाजपच्या वॉर्डात झालेले नाहीत. आमचे नगरसेवक नगरसेवक आहेत. तर तुमचे नगरसेवक नगरसेठ व नगरपिते आहेत, असा घणाघात शिवसेनेचे (shiv sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला.

विकासकामे करण्याचा बाळकडू शिवसेनेच्या (shiv sena) नगरसेवकांनाच मिळाला आहे. ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. अंगावर याल तर शिगांवर घेऊन आपटून टाकू. वाढत्या महागाईवर प्रश्न विचारला तर ते भोंगे लावा म्हणतात. आज कोल्हापुरात भाजपचा दारुण पराभव झाला. जनता खूप शहाणी आहेत. म्हणूनच त्यांनी भाजपचे भोंगे उतरवले, असेही संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

आज महाराष्ट्राला एकजुटीची गरज आहे. कारण, महाविकास आघाडी सरकारला त्रास देण्यासाठी हे केंद्र सरकारचा उपयोग करतात. केंद्रातून सीबीआय, ईडी आदींचा वापर करून त्रास देण्याचा प्रयत्न करतात, असेही संजय राऊत म्हणाले. यादरम्यान त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावरही हल्ला केला. महागाईचा प्रश्न विचारला तर हे लोक भोंगे लावण्याची भाषा करतात, असे राज ठाकरे यांचे नाव न घेता संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

राज ठाकरे यांनी मशिदींच्या भोंग्यांविरोधात भोंगे लावून हनुमान चालिसेचे पठण करण्याचे आवाहन केले होते. त्यांचे हे भाषण भाजप लिखित असल्याचा आरोप होत होता. याला उत्तर देताना राज ठाकरे यांनी उत्तर सभा घेत पुन्हा सरकारवर निशाणा साधला होता. आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता हल्ला केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: अजितदादांच्या अपघात झालेल्या विमानातून मीही...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठं वक्तव्य, काय म्हणाले?

Mumbai: मुंबईत प्रवेश करताना दिसणार भव्य स्वागतद्वार! सर्व एंट्री पॉइंट्सवर प्रवेशद्वार बांधणार; रितू तावडेंची मोठी घोषणा

IND vs SA, Viral Video: गौतम गंभीरने लाईव्ह सामन्यात हार्दिक पांड्याचे कान उपटले... अरे तुला चेंडू तिथे टाकायची काय गरज!

धक्कादायक! Donald Trump यांच्या घरात बंदूक-इंधन कॅनसह घुसखोरीचा प्रयत्न; गुप्तहेरांच्या गोळीबारात संशयित ठार

Indrayani River Pollution: इंद्रायणी प्रदूषणास जबाबदार कंपन्यांवर कारवाई करणार; महापौर रवी लांडगे यांचा इशारा!

SCROLL FOR NEXT