sanjay raut Latest Marathi News sanjay raut Latest Marathi News
महाराष्ट्र बातम्या

शिवसेना जागेवरच, सेनेला अजिबात धक्का लागलेला नाही - संजय राऊत

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : सत्ता असो वा नसो शिवसेनेला फरक पडत नाही. शिवसेना (Shiv Sena) जागेवरच, सेनेला अजिबात धक्का लागलेला नाही. शिवसेनेचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. उद्या (सोमवारी) कळेल लोकशाही शिल्लक आहे की नाही, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. (sanjay raut Latest Marathi News)

रविवारी (ता. १०) मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेची बैठक पार पडली. या बैठकीला खासदार संजय राऊत उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. आमच्या १५-१५ तास बैठका सुरू आहेत. प्रत्येक शिवसैनिक येत आहे. उद्धव ठाकरे यांना भेटत आहे, असेही संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. आम्ही नेहमीसाठी मातोश्रीसोबत आहे. मातोश्री आमच्यासाठी आई आहे. बाळासाहेब ठाकरे आमच्यासाठी आई आहे. आमचे मातोश्रीसोबत असलेले संबंध तोडणार नाही. आमचे संबंध कोणी तोडूही शकत नाही, असेही संजय राऊत म्हणाले.

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) वगळता शिंदे गट व शिवसेनेच्या (Shiv Sena) ५३ आमदारांना (MLA) नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. सोमवारी दोन्ही गटांच्या अर्जावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. लोकशाही आणि न्यायव्यवस्था वेगवेगळ्या आहे की नाही, हे उद्या कळेल. कायद्याची पायमल्ली सुरू आहे. मोठ्या प्रमाणात दबाव टाकला जात आहे. हे आम्हाला माहिती आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

एकनाथ शिंदे गटातील ३९ आमदार आणि उद्धव ठाकरे (uddhav thackeray) कॅम्पमधील १४ आमदारांना (MLA) नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. सोमवारी सुप्रीम कोर्टात दोन्ही गटांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे, हे विशेष...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Paper Leak Fast-Track Courts: पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी; दोषींना कठोर शिक्षा होणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Mumbai News: मोतीलाल नगर पुनर्विकासाची मालकी म्हाडाकडेच; अदाणी फक्त विकासक, म्हाडाचे स्पष्टीकरण

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

SCROLL FOR NEXT