Sanjay Raut controversial statement  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut : एक वादग्रस्त फोटो अन् राऊतांच्या अडचणी वाढल्या; बार्शीत गुन्हा दाखल

संजय राऊतांनी हा फोटो शेअर केल्यानंतर भाजपाच्या चित्रा वाघ यांनी आक्षेप नोंदवला होता आणि राऊतांना सुनावलं होतं.

सकाळ डिजिटल टीम

Sanjay Raut News : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. एक आक्षेपार्ह फोटो ट्वीट केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ट्वीटनंतर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीही राऊतांवर टीका केली होती.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर बार्शीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यांनी ट्वीटरवर एका अत्याचारपीडित मुलीचा रक्तबंबाळ अवस्थेतला फोटो शेअर केला आहे.

आपल्या ट्वीटमध्ये संजय राऊत म्हणतात, "देवेंद्रजी, हे चित्र बार्शीतले आहे.. मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका.भाजपा पुरस्कृत गुंडांनी हा जीवघेणा हल्ला केला आहे. अल्पवयीन मुलगी पारधी समाजाची आहे.गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत ?५ मार्चला हल्ला झाला आरोपी मोकाट आहेत."

यावर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी व्हिडीओच्या माध्यमातून संतप्त प्रतिक्रिया दिली होती. हा व्हिडीओ त्यांनी आपल्या अधिकृत खात्यावरुन ट्वीट केला होता. आपल्या ट्वीटमध्ये चित्रा वाघ यांनी संजय राऊतांनी हा फोटो व्हायरल केल्याबद्दल आक्षेप घेतला होता. तसंच महिला आयोगाला कारवाई करण्याची मागणीही केली होती.

चित्रा वाघ यांनी गृहविभाग आणि मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत संजय राऊतांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sandeep Deshpande : "मराठी सण गुजरात्यांच्या हातात, याला जबाबदार लालबागचा राजा मंडळ", संदीप देशपांडेंची टीका

Congress Corporator House Firing : नागपूरमध्ये मध्यरात्री थरार! काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर अज्ञात युवकांकडून गोळीबार; घातपाताचा संशय बळावला

Kolhapur-Sindhudurg Road : शिवडाव-सोनवडे घाटमार्गातील अंतिम अडसर दूर; केंद्रीय पर्यावरण समितीची मंजुरी, 13 कोटींचा निधी मंजूर, जाणून घ्या कसा असणार नवा मार्ग

Latest Marathi News Live Update : फॉलोऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला 38 धावांची गरज; सोनल दिनूषाच्या खेळीमुळे भारताची चिंता वाढली

Nagpur Godhani Chlorine Gas Leak: गोधनीत पुन्हा क्लोरीन गळतीची भीती; जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभालीवर नागरिकांचे सवाल

SCROLL FOR NEXT