Devendra Fadnavis and Sanjay Raut टिम ई सकाळ
महाराष्ट्र बातम्या

'बर्दाश्त हमने किया है; बरबाद भी हम करेंगे' राऊतांचं भाजपला आव्हान

सकाळ डिजिटल टीम

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत आणि शिवसेनेच्या अन्य नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. याचे पुरावे ते लवकरच देणार असल्याचं स्पष्ट केलंय. यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना प्रत्युत्तर दिलं आहे. उद्या पत्रकार परिषद घेऊन भाजपचा पर्दाफाश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवसेना भवनात ही परिषद होणार आहे, असं ते म्हणाले. (Sanjay Raut Speaks on BJP)

आम्ही काय बोलतो हे संपूर्ण देश ऐकणार आहे. हमने बहोत बरदाश किया है, तो हम ही बरबाद करेंगे, असा चिमटा त्यांनी काढला आहे. शिवसेनेचे खासदार आमदार आणि बडे नेते शिवसेना भवनात उपस्थित असणार आहेत, असं राऊत म्हणाले.

ठाकरे परिवार आणि शिवसेनेच्या ज्या नेत्यांवरर चिखल उडवला जात आहे, त्या सगळ्यांना उत्तरं देणार आहे. केंद्रीय यंत्रणांची शिवसेनेवर सुरू असलेल्या दादागिरीला उत्तर देणार असल्याचं राऊतांनी सांगितलं.

अनिल देशमुखांना ज्या कोठडीत ठेवलं, तिथे तुमची कोठडी असेल, अशा धमक्या येत आहेत.पण पुढच्या काही दिवसात भारतीय जनता पक्षातील साडेतीन लोकं त्याच कोठडीत असतील, अशी माहिती राऊत यांनी दिली. मात्र, हे नेते कोण आहेत याचं स्पष्टीकरण पत्रकार परिषदेत ते देणार आहेत. महाराष्ट्रातही सरकार आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार आहे. त्यामुळे कोणात किती दम आहे हे पाहू, असं आव्हान राऊतांनी दिलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

Pune Hospital Row: टीकेच्या झंझावातात भिमाले माघारी; बाणेर कर्करोग रुग्णालयावरील वडिलांचे नावाचा फलक हटवला

Devgad Hapus AI : देवगड हापूस गुणवत्तेसाठी AI स्कॅनिंग मशीनला अनुदान द्यावे; राहुल शेवाळे यांची केंद्रीय कृषिमंत्र्याकडे मागणी

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मानवंदना

SCROLL FOR NEXT