Sharad pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

शरद पवार पुढाकार घेत नाही, तोपर्यंत देशात पर्यायी सरकार अशक्य, शिवसेना नेत्याचं विधान

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जोपर्यंत पुढाकार घेत नाही, तोपर्यंत देशातील सरकारला पर्याय मिळू शकत नाही, असं ठाम मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. राऊतांनी पुण्यातील एका कार्यक्रमात हजेरी लावली.

यामध्ये शरद पवार आणि संजय राऊत यांची एकाच व्यासपीठावर मुलाखत झाली. दोन्ही नेत्यांनी राजकीय फटकेबाजी केली. यावेळी व्यासपीठावर शरद पवारांसह गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आणि अन्य नेते उपस्थित होते. (Sharad Pawar in Pune)

पुण्यातील कार्यक्रमात बोलताना, महाराष्ट्राने देशाचे नेतृत्व करावे, ही बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका असल्याचं राऊत यांनी म्हटलं. सध्या देशात शरद पवार यांच्याकडे ती ताकद आहे. ते आणि आम्ही एकत्र आलो तर देशाला झूकवू, असं प्रतिपादन राऊतांनी केलं.

सत्तेतील आणि पूर्वीचे असे दोन्ही शरद पवार एकच आहेत. देशातील विरोधी पक्षांना एकत्र आणण्याची ताकद पवारांमध्ये आहे. पवार यांनी पुढाकार घेतल्याशिवाय देशातील सरकारला पर्याय मिळू शकत नसल्याचा दावा राऊतांनी केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आषाढी वारीत यंदा पहिल्यांदाच ‘बीबीपीपीडीआर’ प्रणाली! जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांची माहिती; ५५० मोबाईल अन्‌ यंत्रणेसाठी तीन कोटींचा खर्च, वाचा...

IND vs ENG Test: पहिल्या दिवशी लॉर्ड्सवर अटीतटीचा थरार; मानधना, हरमनप्रीत अन् दीप्तीची अर्धशतकं, इंग्लंड २६४ धावांनी पिछाडीवर

सोलापूर शहर पोलिसांची कामगिरी! हमालाच्या पत्नीचे सौभाग्याचे लेणं चोरणारे दोघे जेरबंद; ६ महिन्यांपूर्वी गड्डा यात्रेत महिलेचे दागिने चोरी, पोलिसांनी तो चोरटा पकडलाच, वाचा...

Monsoon Update News : मान्सूनला अचानक ब्रेक ‘अल निनो’चा प्रभाव वाढला; शेतकऱ्यांसह सामान्य चिंतेत, राज्यात पाऊस पुन्हा कधी सक्रिय होणार?

आजचे राशिभविष्य - 11 जुलै 2026

SCROLL FOR NEXT