esakal
महाराष्ट्र बातम्या

हनुमान आमचा, गदा आमची अन् तशी शिवसेना आमची- संजय राऊत

हनुमान जन्मभूमिच्या वादाचा मुद्दा उपस्थित करत संजय राऊतांनी बंडखोरांना शिवसेना आमचीच असल्याचे खडसावून सांगितले.

धनश्री ओतारी

शिवसेनेतल्या अभूतपूर्व बंडानंतर आता संजय राऊत, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. पुन्हा पक्ष बांधणीसाठी संजय राऊत दौऱ्यावर आहेत. दरम्यान, त्यांनी नाशिकमध्ये शिवसैनिकांना संबोधित केलं असून आक्रमक शैलीत मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या गटावर टीकास्त्र सोडले. अशातच त्यांनी हनुमान जन्माचा मुद्दा उपस्थित करत बंडखोरांना हनुमान आमचा, गदा आमची आणि तशी शिवसेना आमची असे म्हटले आहे.(sanjay raut statement about shivsena maharashtra politics)

हनुमान जन्मभूमिच्या वादाचा मुद्दा उपस्थित करत संजय राऊत यांनी बंडखोरांना शिवसेना आमचीच असल्याचे खडसावून सांगितले. 'हनुमानाच्या जन्मास्थळाच्या वादानंतर सर्व हिंदूचार्य एकत्र आले. आणि सांगितल हनुमानाचा जन्म नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी मध्ये झाला. असे सांगत, हनुमान आमचा, गदा आमची, तशी शिवसेना आमची ' असे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

एकनाथ शिंदे गटाने बंड पुकारल्यापासून आपलाच गट हीच शिवसेना असल्याचा दावा केला होता. मात्र, दरम्यानच्या काळात या गटाने आता बाळासाहेब शिवसेना असेही गटाचे नामकरण केले होते. पण आता न्यायालयातील सुनावणीनंतर पुन्हा आपला गट हीच शिवसेना आहे.

आतापर्यंत शिंदे गट कोणत्या पक्षात विलिन होणार याला पूर्णविराम मिळाला का असा प्रश्न आहे. दुसरीकडे शिवसेना नेते हे काहीही झाले तरी शिवसेना आपलाच पक्ष राहणार आसल्याचा दावा करीत होते. मात्र, सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर शिंदे गटातील वातावरण बदलले असून जे आमच्यासोबत नाहीत त्यांनाच अपात्र करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता नेमकी शिवसेना आणि पक्ष प्रमुख काय भूमिका घेणार हे पहावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

Gram Panchayat Delimitation: प्रभागरचनेचे काम, तलाठ्यांना घाम ; ग्रामपंचायतीकडेच सोपवा; संघटनेची महसूल विभागाकडे मागणी

Laxman Hake: ओबीसी आरक्षणासाठी मोठा एल्गार! लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा; मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

15000 Teacher Recruitment : TET ची अट रद्द! राज्यात 15 हजार शिक्षकांची मेगा भरती; 600 क्रीडा शिक्षकांसाठी स्वतंत्र पात्रता निकष जाहीर, ऑनलाईन मागविले अर्ज

SCROLL FOR NEXT