Sanjay Raut tweet Phone tapping of Sudin Dhavalikar, Vijay Sardesai, Digambar Kamat, Girish Chodankar is going on in Goa
Sanjay Raut tweet Phone tapping of Sudin Dhavalikar, Vijay Sardesai, Digambar Kamat, Girish Chodankar is going on in Goa  Sakal
महाराष्ट्र

'गोव्यात फोन टॅपिंगचा महाराष्ट्र पॅटर्न…गोव्यातील रश्मी शुक्ला कोण?'

सकाळ डिजिटल टीम

राज्यात सध्या फोन टॅपिंग प्रकरण चांगलेच पेटले आहे. पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला (Rashmi Sukla) यांनी राज्यातील महत्वाच्या नेत्यांचे फोन टॅप (Maharashta Phone Tapping Probe) करण्यात आले होते, त्यांच्या विरोधात पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून शुक्ला यांना न्यायालयाने दिलासा दिल्याने त्यांची अटक टळली आहे. आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गोव्यात देखील फोन टॅपिंगचा महाराष्ट्र पॅटर्न सुरु असल्याचा आरोप केला आहे. (Sanjay Raut on Phone Tapping in Goa)

गोवा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज ट्विट करत, महाराष्ट्रात झाले त्याप्रमाणे गोव्यात देखील फोन टॅपिंग सुरु असल्याचा आरोप केला आहे, त्यांनी सुदिन ढवळीकर, विजय सरदेसाई, दिगंबर कामत गिरीश चोडणकर… या नेत्यांचे फोन टॅपिंग सुरू असल्याचे म्हटले आहे. तसेच यासोबतच राऊत यांनी गोव्यातील रश्मी शुक्ला कोण? असा सवाल देखील केला आहे.

शुक्ला यांच्या कार्यकाळात राज्यातील काही दिग्गड नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले होते. यामध्ये बच्चू कडू, नाना पटोंलेचा इत्यादींचा समावेश होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तत्काळ चौकशीचा वेग वाढवण्याचे आदेश दिले. यामुळे रश्मी शुक्ला यांच्या विरोधात पुण्यात बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली. दरम्यान, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शालेय शिक्षण राज्य मंत्री बच्चु कडू, आशिष देशमुख व संजय काकडे यांचे तब्बल साठ दिवस फोन टॅप केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. मात्र, उच्च न्यायालयाने शुक्ला यांना २५ मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं आहे. त्यामुळे त्यांची अटक टळली आहे.

राऊतांचा दोनदा फोन टॅप

दरम्यान, मुंबईच्या कुलाबा पोलीस ठाण्यात रश्मी शुक्ला या़च्या विरोधात नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यात त्यांनी पदाचा गैरवापर करून १ नोव्हेंबर २०१९ मध्ये खासदार संजय राऊत यांचे फोन टॉप केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे या़ंचाही ते भाजपात असताना म्हणजेच ऑगस्ट २०१९ दरम्यान फोन टॅप केल्याचं समोर आलं आहे. संजय राऊत यांचं नोव्हेंबर महिन्यात दोन वेळा फोन टॅप केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधीमंडळ समितीच्या चौकशीत हा प्रकार समोर आल्याची प्राथमिक माहिती आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT