Sanjay Shirsat Controversial Statement 
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Shirsat Controversial Statement: प्रियंका चतुर्वेदी यांच्याबाबत संजय शिरसाटांचे वादग्रस्त विधान; "त्यांना उमेदवारी दिली कारण...”

Sandip Kapde

Sanjay Shirsat Controversial Statement: उद्धव ठाकरे यांनी काल ठाण्यात उत्तर भारतीयांची सभा घेतली. या सभेत खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी शिंदे गटावर टीका केली. यावर आता शिंदे गटातून प्रतिक्रिया येत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार संजय शिरसाट यांनी वादग्रस्त विधान केले आहे. शिरसाट यांनी उद्धव ठाकरे व प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर हल्लाबोल केला. 

"जे दिघे साहेबांचं नाव घेत आहेत. जे ठाण्याची शिवसेना आमची आहे असं म्हणत आहे. ज्या दिघे साहेंबानी शिवसेनेसाठी आयुष्य वेचलं त्या दिघे साहेबांच्या अंत्ययात्रेला उद्धव ठाकरे कुटुंबातील कोणीही व्यक्ती का नव्हते?", असा प्रश्न संजय शिरसाट यांनी उपस्थित केला. 

संजय शिरसाट यांनी खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. चतुर्वेदी यांचा उल्लेख करताना त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी थेट एकेरी उल्लेख करत टीका केली. (Sanjay Shirsat Controversial Statement)

"ठाण्यातील सभेत ती कोण प्रियंका चतुर्वेदी शिवसेनेवर बोलत होती. ती सांगत होती गद्दारांना काहीतरी करायचं होतं. कोण ही चतुर्वेदी? तर शिवसेनेचे त्या काळचे आता उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे म्हणाले होते, आदित्यंनी तिचे सौंदर्य पाहून तिला राज्यसभेची उमेदवारी दिली ती बाई प्रियंका चतुर्वेदी, ह्या पूर्वी काँग्रेसमध्ये होत्या आणि ह्या आम्हाला निष्ठेच्या गप्पा सांगत आहेत. हा मोठा विरोधाभास आहे," असे विधान संजय शिरसाट यांनी केले आहे.

संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांनी तीच ती कॅसेट पुन्हा वाचवली. दरवेळी उद्धव ठाकरे यांना पक्षातील लोक गेली तर ती गद्दार गेली, अशी म्हणायची सवय लागली आहे. तुम्ही नेमकं काय करता, हे उद्धव ठाकरे यांनी कधी सांगितलं का?. खरी गद्दारी उद्धव ठाकरे गटाने केली आहे, असे शिरसाट म्हणाले.

संजय शिरसाट म्हणाले, शिवसैनिकांना दाबायचे, गुलाम बनवायचे या भावनेतून त्यांना वागवायचं. जेव्हा जाहीर सभेचा वेळ येतो तेव्हा जमलेले कळवट शिवसैनिक म्हणायंच, ही त्यांनी नेहमीची लाईन आहे. उद्धव ठाकरे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना देखील विसरले आहेत. शिवसैनिकांची जागा त्यांच्या आयुष्यात कुठे हे त्यांनी स्पष्ट करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Loan Waiver: कर्जमाफीच्या याद्या आज सेवा संस्थांमध्ये, यादीत नाव असल्याची खात्री करावी; आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन

Akole Flood: महापुराने अकोलेचा पश्‍चिम पट्टा वेढला, दरड कोसळल्यानं दहा गावांचा संपर्क तुटला; जमिनी वाहिल्या

Live Updates Marathi : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी; धरणांतील पाणीसाठ्याने मागील वर्षाची सरासरी ओलांडली

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणातील मास्टरमाईंड अटकेत... २५ वर्षांपासून देशभरात चालवत होता रॅकेट, कोण आहे बिजेंद्र गुप्ता?

IND vs ZIM 2nd T20I: वैभव सुर्यवंशीची स्फोटक फलंदाजी आजही पाहायला मिळणार; भारत- झिम्बाब्वे दुसरा सामना किती वाजता अन् कुठे पाहता येणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT