महाराष्ट्र बातम्या

Sanjay Shirsat : ''मी फडणवीसांबद्दल बोललो त्याचं कारण....'' संजय शिरसाटांनी दिलं स्पष्टीकरण

संतोष कानडे

मुंबईः देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात जावं आणि एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रात ठेवावं, असं विधान शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केलं होतं. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी संजय शिरसाटांच्या विरोधात विधानं केली होता. आता शिरसाटांनी सारवासारव केली आहे.

संजय शिरसाट म्हणाले की, मी काल देवेंद्रजींबाबत त्यांनी केंद्रात जाव असं वक्तव्य केलं, ते अनेकांनी उलटं घेतलं, आम्ही जो उठाव केला त्यात फडणवीसांचीही भूमिका होती. माझा मनात त्यांच्याबद्दल आदर आहे. त्यांची बढती व्हावी, या अनुषंगाने मी बोललो होतो.

''देवेंद्रजींनी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात २०२४ च्या निवडणुका होतील, असं म्हटलं आहे. त्यामुळे विरोधकांनी याचं भांडवलं केलं तरी याचा मला फरक पडत नाही. मात्र युतीतील नेत्यांनी यावर बोलू नये. कोणाला मुख्यमंत्री बनवायचं हे वरिष्ठ नेते ठरवतील.''

शिरसाट पुढे म्हणाले, मी नगरसेवक होतो आमदार झालो आता मंत्रिपदाचे डोहाळे लागले, प्रत्येकला आशा असते. मी देवेंद्रजींबाबत बोललो त्यांना केंद्रात मोठं पद मिळावं याबाबत. मात्र त्या वक्तव्याचा विपर्यास होतो आहे. आता यावर मी न बोललेलचं बरं.

मनसेबद्दल बोलताना शिरसाट म्हणाले की, लोकसभेची निवडणुक ही राष्ट्रीय पातळीवरील मुदद्यांवर लढवली जाते. गावात पाणी नाही आलं या मुद्द्यावर लढवली जात नाही. सर्वांना माहित आहे मोदींच्या नेतृत्वात अनेक चांगल्या गोष्टी घडल्या, छोट्या पक्षांचा थोडा परिणाम होईल. पण देशात मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट; पुढील दोन दिवसांत निर्णयाची शक्यता, ऑगस्टचा १५०० रुपयांचा हप्ता कधी मिळणार?

Weekly Horoscope: १४ ते २० सप्टेंबरचा आठवडा ठरणार खास! या राशींना मिळणार पैसा, करिअरमध्ये संधी आणि प्रेमात सुख

Koyna Dam : सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग

Marathi News Live Updates : वरंधा घाटात मध्यरात्री दोन कारची समोरासमोर धडक, तिघे गंभीर जखमी

Ratnagiri CNG: ऐन गणेशोत्सवात सीएनजीचा ठणठणाट; रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वरात रांगा; चाकरमानीसह रिक्षाचालक त्रस्त

SCROLL FOR NEXT