एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात कॉर्डेलिया या आलिशान क्रूझवर सुरू असलेल्या एका पार्टीवर एनसीबीने कारवाई केली होती. या कारवाईमध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला देखील अटक करण्यात आली होती. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी या प्रकरणी समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आज समीर वानखेडे यांच्याकडे असेललं आर्यन खान (Aryan Khan) प्रकरण आता एनसीबीच्या एका टीमकडे देण्यात आलंय. या नव्या टीमचं नेतृत्व एनसीबी अधिकारी संजय सिंह (NCB Officer Sanjay Singh) हे करणार आहेत.
कोण आहेत संजय सिंह?
आर्यन खान प्रकरणाचा तपास एनसीबीच्या दिल्ली टीमकडे सोपवण्यात आला आहे. या टीमचं नेतृत्व आयपीएस संजय सिंह हे करणार आहेत.
संजय सिंह हे 1996 च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवेच्या (IPS) ओडिशा केडरचे अधिकारी आहेत.
संजय सिंह हे एनसीबीमध्ये येण्यारपूर्वी ओडिशाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणून काम करत होते.
सिंग यांनी ओडिशा राज्य सरकारमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
पोलीस आयुक्तालयातील ड्रग टास्क फोर्स (डीटीएफ) चे प्रमुख म्हणून त्यांनी जोरदार काम केलं होतं.
या काळात त्यांनी राज्यात अंमली पदार्थांची तस्करी करणारे रॅकेट फोडण्यासाठी अनेक अमली पदार्थ विरोधी मोहीम सुरू केली होती.
या मोहिमेत त्यांनी मोठ्या धडाडीनं कारवाया करत राज्याला अंमली पदार्थमुक्त करण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता.
मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने संजय सिंह (IPS) यांची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) च्या उपमहासंचालक पदावर नियुक्ती करण्यास मान्यता दिल्यानंतर जानेवारी २०२० मध्ये त्यांनी एनसीही जॉईन केली.
दरम्यान, समीर वानखेडे हे आता एनसीबीच्या दिल्ली कार्यालयाला रिपोर्टींग करणार आहेत. संजय सिंग मुंबई झोनल डायरेक्टर म्हणून कार्यभार स्वीकारतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.