महाराष्ट्र बातम्या

wari 2019 : माउलींच्या पादुकांना नीरास्नान 

सकाळ वृत्तसेवा

सोमेश्वरनगर - टाळ-मृदंगांच्या आणि विठ्ठलनामाच्या टिपेला पोचलेल्या गजरात नीरा (ता. पुरंदर) येथे संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पादुकांचा मानाचा नीरास्नान सोहळा मंगळवारी पार पडला. यानंतर पुणे जिल्ह्याचा निरोप घेत पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात प्रवेश करता झाला. तत्पूर्वी, पिंपरे खुर्द ग्रामस्थांची न्याहारी आणि नीरेकरांच्या दुपार भोजनाचा वारकऱ्यांनी आस्वाद घेतला. 

पालखी सोहळा सकाळी साडेसहा वाजता वाल्हे गावचा निरोप घेऊन नऊ वाजता पिंपरे खुर्द येथील अहल्याबाई होळकर विहिरीशेजारी न्याहारीसाठी विसावला. सरपंच लता थोपटे, उपसरपंच राजेंद्र थोपटे यांच्यासह मान्यवरांनी पालखीचे स्वागत केले. काही ठिकाणी फळे, चहा, पोहे वाटप करण्यात आले; तर काही ग्रामस्थांनी झुणका-भाकर व मिरचीच्या ठेच्याची सोय केली होती. विश्रांतीनंतर साडेअकरा वाजता सोहळा पाऊस झेलत नीरेत पोचला. सरपंच दिव्या पवार, उपसरपंच वर्षा जेधे, अनिल चव्हाण, राजेश काकडे, राजेश चव्हाण, दीपक काकडे, वसंतराव दगडे, बाळासाहेब भोसले, दयानंद चव्हाण यांनी स्वागत केले. यानंतर वाजतगाजत सोहळा नीरा नदीकिनारी भोजनासाठी विसावला. तीस वर्षांच्या परंपरेप्रमाणे दत्ता चव्हाण यांनी पालखीप्रमुखांचा संपूर्ण पोशाख देऊन सत्कार केला.

या वेळी सातारा जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील हजर होते. नीरा ग्रामपंचायतीने फळे व पोहे वाटप केले. समता पतसंस्था यांनी बुंदी वाटप केले. नीरा मेडिकल असोसिएशनच्या वतीने सतीश गालिंदे मोफत औषध वाटप करीत होते. प्राथमिक आरोग्य केंद्रानेही शेकडो लोकांवर मोफत उपचार केले. समर्थ पतसंस्था, मनोज शहा, बाळासाहेब ननावरे आदींनी भोजनव्यवस्था केली होती. पंचक्रोशीतील भाविकांनी रांगा लावून दर्शन घेतले. दीड वाजता हा सोहळा नीरास्नानासाठी मार्गस्थ झाला. नीरा नदीवरील जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून नगारखाना, अश्व, टाळकरी, झेंडेधारी, पताकाधारी अशा रचनेत सोहळा नदीत उतरला. राजाभाऊ आरफळकर आणि सोहळाप्रमुखांच्या हातात माउलींच्या पादुका देण्यात आल्या. "माउली माउली'च्या जयघोषात व टाळ-मृदंगांच्या गजरात पादुकांना शाही स्नान घालण्यात आले. यानंतर समता आश्रमशाळेच्या मुलांच्या वाद्य पथकाने पालखीचे सातारा जिल्ह्यात स्वागत केले. या प्रसंगी प्रांताधिकारी संतोष जाधव, तहसीलदार अतुल म्हेत्रे, पुरंदरचे सभापती रमेश जाधव, जिल्हा परिषदेचे प्रभाकर गावडे उपस्थित होते. नीरा नदीपात्रात पुरेसे पाणी वीर धरणातून सोडण्यात आले होते. तसेच, नीरा डावा व उजवा कालव्यातून जादा पाणी सोडले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : भाजप नेत्यावर झाडल्या तीन गोळ्या, जागीच मृ्त्यू; घराबाहेर उभा असताना हल्लेखोर आले अन्...

Sangli Raisins : जानेवारीऐवजी फेब्रुवारीत बेदाणा हंगाम; शेतकरी आणि शेडमालकांची चिंता वाढली

Sangli Municipal : लहान भूखंडधारकांना दिलासा! बांधकाम परवान्याचे अधिकार थेट नगररचना विभागाकडे

Pumpkin Seeds Before Bed: रात्री झोप येत नाही? झोपण्यापूर्वी भोपळ्याच्या बिया खाल्ल्यावर काय होतं, आहारतज्ज्ञांनी सांगितलं सत्य

Mumbai Local: नववर्षाच्या जल्लोषासाठी मुंबई लोकल सज्ज! मध्यरात्री धावणार विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक

SCROLL FOR NEXT