MLA Santosh Bangar Audio Clip  esakal
महाराष्ट्र बातम्या

Santosh Bangar Hingoli Video : अरे पवार आमदार बांगर बोलतोय... सोशल मिडीयावर राडा

सकाळ डिजिटल टीम

हिंगोली: शिंदे गटाचे नेते आणि हिंगोलीचे आमदार संतोष बांगर हे वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आमदार बांगर यांचा पुन्हा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये संतोष बांगर एक अधिकाऱ्याला वीज कनेक्शन तोडल्यावरून धमकी देताना दिसून येत आहेत.

बांगर हे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदारसंघाचे आमदार आहेत. कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणं, धमकावणे यासारख्या प्रकारांमुळे चर्चेत असतात. आता बांगर हे एका वीज कर्मचाऱ्याला दम देताना दिसत आहेत.

हेही वाचा - मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

या व्हिडिओत आमदार बांगर हे त्यांच्या गाडीत बसून लाऊड स्पीकरवर कर्मचाऱ्याशी बोलताना दिसत आहेत. तुला कळत नाही इकडंची लाईन तोडू नये, दुसरं कोणी असतं तर अन्यथा रट्टे द्यायला लावेल बरं. तुम्हाला सांगितलं होतं लाईनीला हात लावायचा नाही म्हणून..असा इशारा बांगर यांनी दिला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. कृषी पंपांच्या थकीत बिलांमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून वीज कनेक्शन तोडण्यात आल्याने बांगर यांनी संतापून अधिकाऱ्याला दम दिला आहे.

काही दिवसांपूर्वी देखील संतोष बांगर यांनी हिंगोलीतील पीक विमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली होते. त्यांनी पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT