Maratha Reservation 
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : 'मामा प्लीज एक घोट पाणी घ्या ना...'; हातात पाण्याची बाटली घेत चिमुरडीची जरांगेंना आर्त विनवणी

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचं गेल्या सहा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे.

रोहित कणसे

मराठा आरक्षणासाठी राज्यातील वातावरण पेटल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. अन्न-पाणी सोडल्याने जरांगे यांची तब्येत चांगलीच खालावली आहे.

त्यामुळे मराठा समाजाकडून त्यांनी पाणी तरी घ्यावं अशी मागणी करण्यात येत आहे. यावेळी नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातून आलेली एक मुलगी देखील जरांगेंनी पाणी घ्यावं यासाठी मला त्यांना भेटू द्या अशी विनवणी करताना दिसली.

संतोषी नावाची ही मुलगी डोळ्यात पाणी आणून मला दोन मिनीटं तरी मनोज जरांगे यांच्याशी बोलू द्या अशी विनवणी करत होती. ...ते पाणी पित नाहीयते, मला दोन मिनीटं त्यांच्याजवळ येऊ द्या अशी विनंती करणारी ही चिमुरडी हातात पाण्याची बाटली घेऊन मामा प्लीज एक घोट तरी पाणी घ्या ना..., अशी कळकळीची विनंती करताना दिसली.

आंदोलनस्थळी माध्यमांशी बोलताना, ते हात दाखवत आहेत, पण पाणी पीतच नाहीयेत. मी रात्री दोन वाजता आई आणि बहिणीसोबत आले..असेही या मुलीने सांगितलं.

अन्न-पाणी सोडलेल्या जरांगे यांची प्रकृती ढासळत असल्याने मराठा समाजाकडून देखील त्यांनी पाणी घ्यावं अशी मागणी केली जात होती. अंतरवली सराटी येथे जमलेल्या नागरिकां नी हात जोडून तु्म्ही पाणी प्यावेच लागेल अशी विनवणी केली. यानंतर या विनंतीला मान देत भावूक झालेल्या मनोज जरांगे यांनी थोड्या वेळा दोन-चार घोट पाणी पिण्याचं मान्य केलं.

दरम्यान उपोषणस्थळी असलेल्या डॉक्टरांनी मनोज जरांगे यांच्या आरोग्याविषयी माहिती देताना सांगितलं की, सध्या मनोज जरांगेंवर उपचारांची खूपच गरज आहे. कारण पाच ते सहा दिवस झाले त्यांच्या पोटात अन्न नाही.

त्यामुळं डिहायड्रेशन खूप झालंय, त्यांना खूपच विकनेस आला आहे. बीपी पण कमी झालेला असणार आणि शुगर पण. जर अशीच परिस्थिती राहिली तर त्याचा त्यांच्या लिव्हरवर आणि किडनीवर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. मात्र मनोज जरांगे यांच्याकडून सतत अन्न-पाणी यासोबतच वैद्यकीय उपचार देखील घेण्यास नकार दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT