Shambhuraj Desai esakal
महाराष्ट्र बातम्या

Shambhuraj Desai : आरेरावीची भाषा मंत्र्याला भोवली! शंभूराज देसाईंच्या पत्रकार परिषदांवर सातारा पत्रकार संघाचा बहिष्कार

शंभूराज देसाई यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांशीच हुज्जत घातली.

सकाळ डिजिटल टीम

'जर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास ते (शंभूराज देसाई) बांधिल नसतील, तर पत्रकार परिषदेला जाण्यासही पत्रकार बांधील नाहीत.'

सातारा : राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या पत्रकार परिषदांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय साताऱ्यातील पत्रकार संघटनांनी एकत्रित घेतला आहे. सातारा जिल्हा पत्रकार संघाने (Satara Patrakar Sangh) साताऱ्यात हा निर्णय जाहीर केला.

शंभूराज देसाई यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांशीच हुज्जत घातली. प्रश्नाची माहिती न घेता पत्रकारांनाच आपला प्रश्न अपुऱ्या माहितीच्या आधारे आहे, असा प्रतिप्रश्न करण्याचा, तसेच आपल्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधिल नाही, असे उत्तर देण्याचा प्रकार त्यांच्याकडून सातत्याने होत होता.

त्यामुळे जर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास ते बांधिल नसतील, तर पत्रकार परिषदेला जाण्यासही पत्रकार बांधील नाहीत. त्यामुळे त्यांच्या पत्रकार परिषदेवर यापुढे बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असून, मराठी पत्रकार परिषदेसह सर्व संघटनांचाही पाठिंबा आहे.

मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष हरिष पाटणे, सातारा पत्रकार संघ अध्यक्ष विनोद कुलकर्णी, मराठी पत्रकार परिषद संलग्न सातारा जिल्हा पत्रकार संघ, सातारा पत्रकार संघ, इलेक्ट्रॉनिक मीडिया संघ, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, डिजिटल मीडिया परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लावणीच्या नावावर अश्लीलतेला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी घ्यावं लागेल प्रमाणपत्र, त्यानंतरच परवानगी; सरकारचा मोठा निर्णय

कार उलटल्यानंतर ट्रकला धडकली, चौघांचा जागीच मृत्यू; देवदर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, ५ जण गंभीर

Shravan Belpatra Rules: बेलाचं पान कधी तोडावं? कधी तोडू नये? 'या' चुकांमुळे लागू शकतो दोष; जाणून घ्या योग्य नियम

Independence Day Live Update : पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण, चंद्रकांत खैरेंचा कानमंत्र; दानवेंची गळाभेट चर्चेत

FDA Action: डॉमिनोजनंतर तुकाराम मुंढेंचा झेप्टो, इन्स्टामार्टसह फ्रुटीवर प्रहार; ११ तास छापेमारी, १४ परवाने निलंबित

SCROLL FOR NEXT