Sharad Pawar  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : कराडमध्ये हात उंचावत शरद पवार म्हणाले, 'राष्ट्रवादी फोडणाऱ्यांना जनता...'

जनतेला विश्वास देण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मैदानात

अंकिता खाणे (Ankita Khane)

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रविवारी मोठा राजकीय महाभूकंप घडला आहे. पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी झाली असून जवळपास 40 आमदारांसह अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे ९ आमदार मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर शरद पवार या संपूर्ण घटनेनंतर अॅक्शनमोडमद्धे आले आहेत. (Latest Marathi News)

त्यानंतर आज शरद पवार कराडमध्ये दाखल झाले. शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ असलेल्या प्रीतीसंगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी जमलेले कार्यकर्ते आणि नागरीकांना संबोधित केलं. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले कि, यशवंतराव चव्हाण यांनी राज्यामध्ये नवी पिढी तयार केली. प्रत्येक जिल्ह्यात युवकांचा संच निर्माण केला. त्या माध्यमातून महाराष्ट्राचा विकास केला. आता सामान्य माणसांचा लोकशाहीचा अधिकार जपला पाहिजे, असे शरद पवार यांनी म्हंटलं आहे.(Latest Marathi News)

महाराष्ट्र आणि देशात जातीय धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा फोडफोडीच्या भाजपच्या प्रवृत्तीला आपल्यातील काही लोक बळी पडले. महाराष्ट्रात उलथापलथ करण्याची भूमिका काही प्रवृत्तींनी घेतली, पण या फोडाफोडीचा त्यांना काही फायदा होणार नाही. अशा प्रवृत्तींना महाराष्ट्रातील सामान्य जनता उलथवून लावल्याशिवाय राहणार नाही असं शरद पवार कराडमध्ये बोलताना म्हणालेत. (Latest Marathi News)

शरद पवार बोलायला उभे राहिले तेव्हा त्यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्यात. 'देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो…, शरद पवार तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है', अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या आहेत.

समाजात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशभरातील विरोधी पक्षांची सरकारं पाडण्याचा प्रयत्न सुरु आहे. महाराष्ट्रात, देशात धार्मिक संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रवादी फोडणाऱ्यांना जनता त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादीमध्ये जे काही झालं त्यासंदर्भात पुन्हा एकदा जनतेच्या न्यायालयात जाणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT