महाराष्ट्र बातम्या

खेळाडू, एन.सी.सी, स्काउट गाइडच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारचा महत्वाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

सातारा : इयत्ता दहावी आणि बारावीतील खेळाडू विद्यार्थ्यांना तसेच एन.सी.सी, स्काउट गाइडमधील विद्यार्थ्यांना प्राविण्यानूसार सवलतीचे वाढीव गुण दिले जातात. त्यासाठी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयात एक जानेवारी ते पाच एप्रिल पर्यंत शाळा, महाविद्यालय संस्था संबंधित विद्यार्थ्यांचे प्रस्ताव पाठविले जातात. संबंधित जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातून या प्रस्तावाची छाननी करुन पात्र प्रस्ताव शिफारशीसह विभागीय शिक्षण मंडळास 30 एप्रिल पर्यंत पाठविण्याचा कालावधी निश्‍चित करण्यात आला आहे. दरम्यान राज्यात उदभवलेल्या कोरोना (कोविड 19) विषाणुच्या प्रादुर्भावामुळे असामान्य परिस्थितीमुळे खेळाडूंचे क्रीडा गुण प्रस्ताव तसेच एन.सी.सी. स्काऊट गाईडमधील विद्यार्थ्यांचे सवलतीचे प्रस्ताव जमा करण्यात आणि शिक्षण मंडळास पाठविण्यात अडचणी निर्माण झाल्या. त्यानुषंगाने शासनाने हे प्रस्ताव सादर करण्यास आणि शिक्षण मंडळास पाठविण्यासाठी मुदत वाढ दिली होती. 

दरम्यान मुदत वाढ देऊनही अनेक विद्यार्थ्यांचे प्रस्ताव संबंधित जिल्हा क्रीडाधिकारी यांना मुदतीत सादर होऊ शकलेले नाहीत. त्याबाबत राज्यातील लोकप्रतिनिधींनी , खेळाडू संघटनांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडे सवलतीचे गुणांबाबतचे प्रस्ताव तसेच एन.सी.सी., स्काऊट गाईडमधील विद्यार्थ्यांचे प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली आहे. त्यानूसार शिक्षण मंडळाने शासनाला मुदत वाढीबाबतचा प्रस्ताव शासनास नुकताच पाठविला होता. शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने आज (सोमवार) मुदत वाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. त्याबाबतचा आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी काढला आहे.

या आदेशात राज्यात उदभवलेल्या कोरोना (कोविड 19) विष्णुाच्या प्रादुर्भावामुळे उदभवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे आणि विद्यार्थी हित लक्षात घेता. खेळाडू क्रीडा गुण प्रस्ताव तसेच एन.सी.सी स्काऊट गाईडमधील विद्यार्थ्यांचे सवलतीचे परिपुर्ण प्रस्ताव शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक , प्राचार्य यांनी 20 जून 2020 पर्यंत जिल्हा क्रीडाधिकारी यांच्याकडे सादर करावेत. तसेच जिल्हा क्रीडाधिकारी यांनी प्राप्त प्रस्तावांची छाननी करुन 25 जून 2020 पर्यंत संबंधित विभागीय मंडळ कार्यालयास शिफारशींसह सादर करावेत असे स्पष्ट केले आहे. दरम्यान हा शासन निर्णय केवळ सन 2019-20 या एका शैक्षणिक वर्षाकरीता लागू राहणार आहे. तसेच ही अंतिम मुदतवाढ असेल, निकाल वेळेवर लागण्याच्या दृष्टीने यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.

दहावी नंतर करिअर फक्त कसे निवडावे नव्हेतर कसे घडवावे यासाठी जॉईन करा सकाळ आणि दिशा अकॅडमी, वाई आयोजित वेबिनार
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुर्घटनेतून एकटा वाचला, आता घरी एकटाच बसून राहतो, पत्नी-मुलाशीही बोलत नाही; कशी झालीय अवस्था?

Free Electricity: राज्यात सर्वसामान्यांना २५ वर्षे मोफत वीज; १०० युनिटपर्यंत दिलासा, स्मार्ट योजनेसाठी महावितरणचा पुढाकार

Sourav Ganguly Video : महिलांना क्रिकेट खेळण्याची गरज नाही! सौरव गांगुलीचा जुना व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय म्हणाला होता? ऐका...

Latest Marathi News Live Update : फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण,नागपुरात डॉक्टरांची शांतता रॅली

Nagpur News: बहिणीच्या मूळ पेशींमुळे चिमुकलीला मिळाले जीवनदान; रक्ताच्या कर्करोगावर बोनमॅरो ट्रान्सप्लांट ठरले यशस्वी

SCROLL FOR NEXT