Eknath Shinde News, Satara News  esakal
महाराष्ट्र बातम्या

Satara News: उद्धव ठाकरेंची नवी खेळी! शिंदेंच्या होमपीचवर भाजप आमदाराचा भाऊ करणार ठाकरेंना मदत

शिवसैनिकांना ताकद देण्यासाठी उद्धव ठाकरेंची मोठी खेळी

रुपेश नामदास

राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे गटात इनकमिंग सुरूच आहे. ठाकरे गटातील शिवसेना फुटून एकनाथ शिंदे गटासोबत जात असल्याचे दिसत आहे. दरम्यान आता शिंदे- भाजपला शिवसेना ठाकरे गटाने मोठा धक्का दिला. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठी खेळी खेळत भाजपच्या भावालाच गळाला लावत त्याच्यावर मोठी जबाबदारी देखील देण्यात आली आहे. (Jaykumar Gore vs Shekhar Gore)

२०१९ च्या विधानसभा निवडणूकीत भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढलेले माण-खटाव मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांचे सातारा हे होम पीच आहे. शिंदे गटाला टक्कर देण्यासाठी शिवसेनेला मोठ्या आणि प्रभावी चेहऱ्याची गरज होती.

हेही वाचा-दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी शिव व्याख्याते नितीन बानुगडे यांना बाजूला करत सातारा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून शेखर गोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे साताऱ्यात ठाकरे गटाला मोठी उभारी मिळू शकते. शेखर गोरे हे आक्रमक नेते आहेत. त्यामुळे साताऱ्यात शिवसेना वाढवण्यासाठी त्यांचा चांगला फायदा ठाकरे गटाला होवू शकतो. त्यामुळं आता भाजप विरूध्द ठाकरे गट असा सामना साताऱ्यात पाहिला मिळू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

‘हाफ सीए’ सीझन २: सीए बनायची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची कहाणी आता ओटीटीवर; ट्रेलर प्रदर्शित

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : नागपुरात मारबत उत्सवाला सुरुवात...

Airtel Recharge : एअरटेलचा पुन्हा धक्का! 'या' रिचार्ज प्लॅनचे दर झाले कमी, पण ग्राहक का नाराज? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT