jaykumar Gore 
महाराष्ट्र बातम्या

Jaykumar Gore : आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात; गंभीर दुखापत

सकाळ डिजिटल टीम

पुणे - भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला आज पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातानंतर गाडी ५० फुट खोल दरीत कोसळली. यावेळी गाडीत आमदार गोरेंसह चौघे जण होते. जखमींना उपचारासाठी बारामतीला हलविण्यात आलं. तर गोरे यांच्यावर पुण्यात उपचार सुरू आहे. गोरे हे सातारा जिल्ह्यातील मान-खटावचे आमदार आहेत. (jaykumar Gore accident news in Marathi)

या अपघातात गोरे यांच्यासह चौघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात कार ५० खोल दरीत कोसळली. या अपघातात जयकुमार गोऱे थोडक्यात बचावले. मात्र त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. दोघांना बारामीत येथील रुग्णालयात हालविण्यात आलं आहे. तर जय कुमार गोरे यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जयकुमार गोरे यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. पहाटे साडेतीन वाजता हा अपघात झाला आहे.

पुण्याहून गावी दहिवडीकडे जात असताना हा अपघात झाला. मात्र, काळोखामुळे कार चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT