satej patil esakal
महाराष्ट्र बातम्या

दिवंगत चंद्रकांत जाधवांच्या स्वप्नपूर्तीसाठी साथ द्या; सतेज पाटील

आता काँगेस विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर: स्वर्गीय चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांचे कोल्हापूरच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोल्हापूरकर त्यांच्या पाठीशी राहतील असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी व्यक्त केला. त्यांनी ट्विट करत कोल्हापूरकरांना (Kolhapur) पाठिंब्यासाठी साद घातली आहे. (Kolhapur North Election 2022)

पोटनिवडणुकीसाठी शिवसेना (Shivsena) व काॅंग्रेस (Congress) या महाविकास आघाडीतील दोन पक्षांत चुरस निर्माण झाली होती. मुंबईत गुरुवारी (ता. १७) झालेल्या बैठकीनंतर ही जागा कॉंगेसला देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी घेतला. त्यामुळे आता काँगेस विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे आमदार (कै.) चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी श्रीमती जयश्री जाधव यांना काँग्रेसची उमेदवारी काल रात्री उशिरा जाहीर झाली. काल भाजपने सत्यजित कदम यांचे नाव जाहीर केले होते. दरम्यान शिवसेनेतर्फे राजेश क्षीरसागर यांनी लढण्याची तयारी केली होती. मात्र महाविकास आघाडीने काँग्रेसची उमेदवारी जाहीर केली. यामुळे नाराज झालेले क्षीरसागर हे नाॅट रिचेबल झाले आहेत. श्रीमती जयश्री जाधव यांच्या नावाची काँग्रेसकडून घोषणा होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

सतेज पाटील यांनीही ट्विट करत त्यांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पक्षाच्या श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Racism in Australia : भारतीयांना मारुन टाका अन् त्यांच्या बायका गुलामगिरीसाठी विका... ऑस्ट्रेलियात वर्णद्वेषाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

College Student Death : वाढदिवसाच्या 3 दिवस आधीच काळाचा घाला! कोल्हापुरात 18 वर्षांच्या महाविद्यालयीन तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल; घरात कोणी नसताना संपवलं जीवन

Hingoli: हिंगोली जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का; वसईजवळ ३.५ तीव्रतेची नोंद, जीवित-वित्तहानी टळली..

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत पुन्हा भूकंप, 3.5 रिश्टर्स स्केअर भूकंप झाल्याची भूमापक केंद्रावर नोंद

...अन् अचानक सेटवर आले रोहित शेट्टी! 'Governor' च्या शूटिंग दरम्यान चिन्मय मांडलेकरसोबत घडला रंजक प्रसंग

SCROLL FOR NEXT