satej patil sakal
महाराष्ट्र बातम्या

'कोल्हापूरची बदनामी आम्ही खपवून घेणार नाही'

'कोल्हापूर उत्तर मतदारसंघात पराभव दिसत आहे. त्यामुळे चुकीचे आरोप करुन निवडणूक वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचा भाजपचा प्रयत्न'

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : आज सोमवारी (ता.चार) राज्याचे गृह राज्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांना कोल्हापूरची बदनामी खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला. पाटील म्हणाले, कोल्हापूर महिलांसाठी सुरक्षित नसल्याचा भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचा आरोप हा कोल्हापूरची बदनामी करणारा आहे. ही बदनामी योग्य नसल्याने आम्ही खपवून घेणार नसल्याचा इशारा सतेज पाटील (Satej Patil) यांनी वाघ यांना दिला. चित्रा वाघ यांची कोल्हापूर (Kolhapur) येथे प्रचारसभा सुरु असताना दगडफेक झाल्याची घटना घडली. (Satej Patil Warn Chitra Wagh And Said Don't Defame Kolhapur)

त्यावर वाघ म्हणाल्या होत्या, की कोल्हापूरमध्ये महिला असुरक्षित आहेत. पत्रकार परिषदेत गृहमंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूर उत्तर मतदारसंघात पराभव दिसत आहे. त्यामुळे चुकीचे आरोप करुन निवडणूक वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न सुरु आहे. कालच्या घटनेची चौकशी करावी अशा सूचना पोलिस खात्याला दिले आहेत.

तसेच प्रचाराला येणाऱ्या भाजप नेत्यांना दुप्पट सुरक्षा देण्याची विनंतीही केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दगडफेकीची घटना मॅनेज असून हा भाजपचा डाव आहे, असा आरोप पाटील यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT