Satyajeet Tambe 
महाराष्ट्र बातम्या

Satyajeet Tambe : थोरातांसोबतच्या बैठकीनंतर एच.के. पाटील म्हणाले, काँग्रेस हायकमांड...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासूनच काँग्रेसमधील अंतर्गत गोंधळ चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली होती. त्यातच निवडणुकीतील अपक्ष विजयानंतर सत्यजीत तांबे यांनी अनेक गौप्यस्फोट केले. तसेच राज्यातील काँग्रेस नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यातच थोरात यांनी आपल्या विधानसभेतील गटनेतेपदाचा राजानामा देत एकच खळबळ उडवून दिली. या घडामोडीनंतर आज थोरात यांनी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच.के. पाटील यांची भेट घेतली. (Satyajeet Tambe news in Marathi)

या भेटीनंतर पाटील म्हणाले की, मी थोरातांचं पूर्ण ऐकून घेतलं. काही दिवसांपूर्वीच मी काँग्रेस अध्यक्षांना भेटलो होतो. याबाबत सविस्तर चर्चा झाली. तसेच राज्यात झालेले गैरसमज त्यांच्यापर्यंत पोहोचवले. मागील काही दिवसांत झालेले गैरसमज काँग्रेस पक्षाचे कुटुंबीक आहेत. या समस्या लवकरच सोडवण्यात येतील. तसेच थोरात रायपूर येथे होणाऱ्या पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचंही पाटील यांनी म्हटलं.

दरम्यान आमचा अंतर्गत प्रश्न आहे. बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा मान्य करण्याचा विषयच येत नाही. खुद्द मी थोरातांना विनंती केली की, तुम्ही काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित राहा. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि थोरात यांची भेट होणार आहे. तसेच थोरात यांचा राजीनामा मंजुर झाला नसल्याचंही पाटील यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT