solapur police

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

मोबाईलमध्ये ‘हा’ नंबर सेव्ह करुन ठेवाच! अडचणीवेळी मिळेल अवघ्या ५.५० मिनिटात पोलिसांची मदत; नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची २४ तास सेवा

डायल ११२ वर संपर्क केल्यानंतर सुरवातीला आपले नाव, परिसराची माहिती द्यावी लागते. त्यानंतर आपल्याला आलेली अडचण थोडक्यात सांगितल्यानंतर शहरातील कोणत्याही कानाकोपऱ्यातील त्या व्यक्तीला सरासरी ५.५० मिनिटात पोलिसांची मदत मिळते.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : शहराची लोकसंख्या ११ लाखांवर असतानादेखील शहरात अवघी सात पोलिस ठाणी आहेत. शहराचा विस्तार वाढल्याने अडचणीतील लोकांना पोलिसांची मदत घ्यायला वेळेत पोचता येत नाही. अशावेळी त्या लोकांना ‘डायल ११२’ या टोल फ्री क्रमांकावर एक कॉल करून मदत घेता येते. पूर्वी यावरून मदत मिळायला सात मिनिटे लागत होती, आता अवघ्या पाच मिनिटे ५० सेकंदात पोलिसांची मदत मिळते.

मुंबई, ठाणे, पुणे अशा मोठ्या शहरांमध्ये रात्री-अपरात्री प्रवास करताना महिला, तरुणींना अडचण आल्यास त्यांना डायल ११२ वरून पोलिसांची मदत होते. सोलापूर शहरात असा प्रसंग कधी घडला नाही, पण घरगुती भांडण, शेजारच्यांची मारहाण, पती-पत्नी, सासू-सून यांच्यातील भांडण, यासंदर्भात पोलिसांच्या कंट्रोल रुमकडे कॉल येतात. तक्रारींचे स्वरूप किरकोळ असल्याने त्याठिकाणी मदतीसाठी एक किंवा दोन पोलिस अंमलदार जातात. अनेकदा भांडण करणारा त्यांनाही आवरत नाही, त्यावेळी आणखी अंमलदार बोलावून घेतले जातात.

सध्या शहरातील सात पोलिस ठाण्याअंतर्गत प्रत्येकी चार गाड्या आहेत. त्यात दोन बीट मार्शल व दोन अंमलदार अशी टीम असते. पोलिसांकडून ही सेवा २४ तास दिली जाते. डायल ११२ वरून अडचणीतील लोकांना मदत करायला धावणाऱ्या पोलिस अंमलदारांचे प्रशिक्षण घेण्यात आले असून त्यामुळे मदतीचा वेळ देखील पूर्वीपेक्षा एक मिनीट १० सेकंदाने कमी झाला आहे.

‘या’ क्रमांकावर साधा संपर्क

डायल ११२ वर संपर्क केल्यानंतर सुरवातीला आपले नाव, परिसराची माहिती द्यावी लागते. त्यानंतर आपल्याला आलेली अडचण थोडक्यात सांगितल्यानंतर शहरातील कोणत्याही कानाकोपऱ्यातील त्या व्यक्तीला सरासरी ५.५० मिनिटात पोलिसांची मदत मिळते. सुरवातीला एक-दोन अंमलदार तेथे जातात आणि घटनेच्या स्वरुपावरून अतिरिक्त अंमलदारांना बोलावून घेतले जाते.

दररोज येतात सरासरी १२ ते १४ कॉल

पती दारू पिऊन पत्नीला मारहाण करतोय, सून किंवा मुलाची वडिलांसोबत भांडण सुरू आहे, शेजारच्यांशी भांडण, मारहाण सुरू आहे, असे कॉल ‘डायल ११२’वर अधिक आहेत. दरमहा साधारणत: ३५० ते ४०० कॉल (दररोज १२ ते १४) येतात. काहीजण विनाकारण कॉल करतात आणि मोबाईल बंद करून ठेवतात. अशा लोकांवर पोलिसांत गुन्हा दाखल होतो, त्याला समज दिली जाते.

- राजन माने, सहायक पोलिस आयुक्त, सोलापूर शहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK : हॅरिस रौफने लायकी दाखवली! भारतीय फलंदाजांनाच नव्हे, तर चाहत्यांनाही डिवचले; Video पाहून तुमचेही रक्त खवळेल

बापरे! 25 मिनिटांसाठी कोट्यवधींचा खर्च, पुण्यात PM मोदींच्या वाढदिनी ड्रोन शोसाठी पैशांची उधळपट्टी; वसंत मोरेंची टीका

हे कोल्हापूर हाय भावा, इथं विषय हार्डच असतो! भारत-पाक सामना दुबईत, जल्लोष शिवाजी चौकात; पाकिस्तानवरील विजयानंतर फटाक्यांची आतषबाजी

महाराष्ट्रातील तरुणांना लियोनेल मेस्सीसह खेळण्याची संधी; अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू १४ डिसेंबरला मुंबईत

चीनने शोधली संकटात संधी! अमेरिकेनं H1 Bचे शुल्क वाढवताच केली K व्हिसाची घोषणा

SCROLL FOR NEXT